Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रेटिंग अपग्रेड, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, यापूर्वी 1450% परतावा दिला

Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीने स्वतःला कर्जमुक्त घोषित केले आहे. मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 1000 रुपये किमतीच्या पार गेले होते. मागील चार वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1450 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
ब्रोकरेज फर्म जेफरीज आणि जेएम फायनान्शियलने टाटा मोटर्स स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.62 टक्के वाढीसह 992 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
टाटा मोटर्स कंपनी कर्जमुक्त झाली आहे. आता कंपनीने दावा केला आहे की, त्यांची ब्रिटिश शाखा असलेली जग्वार लँड रोव्हर कंपनी आर्थिक वर्ष 2025-2026 पर्यंत निव्वळ कर्जमुक्त होऊ शकते. आर्थिक वर्ष 2023-2024 च्या मार्च तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीच्या नफ्यात तीन पट वाढ झाली आहे. मार्च 2023 तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने 17,528.59 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत या कंपनीने 5,496.04 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये टाटा मोटर्स कंपनीने 31,806.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कंपनीने 2,689.87 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
शेअर बाजारातील तज्ञांनी टाटा मोटर्स स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1250 रुपये किमतीवर जाऊ शकतो. टाटा मोटर्स कंपनीने भारतातील प्रवासी वाहन बाजारातील वाटा आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत 16 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. मॉर्गन स्टॅनली फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉक 1150 रुपये किमतीवर जाऊ शकतो. Emkay Global फर्मने देखील टाटा मोटर्स स्टॉक 1,050 रुपये टारगेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
ब्रोकरेज फर्म जेएमएम फायनान्शियलने टाटा मोटर्स स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन 1200 रुपये टारगेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मागील चार वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1450 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही चार वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 15 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Motors Share Price NSE Live 17 June 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं