Tata Technologies IPO | खळबळ माजवणार IPO! आजच्या GMP प्रमाणे पहिल्याच दिवशी 75% परतावा मिळेल, पुढे किती?

Tata Technologies IPO | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 475-500 रुपये जाहीर केली आहे. ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक जबरदस्त कामगिरी करत आहे.
तज्ज्ञांच्या मते, टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी ग्रे मार्केटमध्ये 340 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स 850 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.
जर टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 500 रुपये अप्पर किंमत बँडवर वाटप केला गेला, तर या कंपनीचे शेअर्स 850 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. तज्ञांच्या मते स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 75 टक्के नफा मिळू शकतो. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे IPO शेअर्स 30 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ शकतात. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध केले जातील. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीची स्थापना 1994 साली करण्यात आली होती.
किरकोळ गुंतवणूकदार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO मध्ये किमान एक लॉट आणि कमाल 13 लॉट खरेदी करू शकतात. एका लॉटमध्ये कंपनीने 30 शेअर्स ठेवले आहेत. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO मध्ये एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांना 15000 रुपये जमा करावे लागतील. आणि कमाल 13 लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना 2 लाख रुपये जमा करावे लागतील.
टाटा टेक्नॉलॉजीज ही कंपनी मुख्यतः आपल्या ग्राहकांना ऑटोमोटिव्ह, औद्योगिक हेवी मशिनरी आणि एरोस्पेस क्षेत्रातील कंपन्यांना टेक्निकल सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी Cyient, Infosys, KPIT Technologies, Persistent यासारख्या दिग्गज कंपन्यांना स्पर्धा देत आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनी आयपीओद्वारे 4,000 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. टाटा समूहाच्या कंपनीचा शेवटचा IPO हा TCS कंपनीचा होता, जो 2004 साली लाँच करण्यात आला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Technologies IPO GMP 18 November 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं