Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स खरेदी करावा की विकावा? डेली चार्टवर शेअरची स्थिती चिंताजनक

Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 30 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करणार आले होते. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. टाटा टेक्नॉलॉजी IPO स्टॉक 1200 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. ही लिस्टिंग किंमत 500 रुपये या इश्यू किंमतीच्या तुलनेत 140 टक्के अधिक होती.
ज्या गुंतवणूकदरांनी टाटा टेक्नॉलॉजी IPO मध्ये पैसे गुंतवले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य स्टॉक लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी 140 टक्के वाढले होते. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या स्टॉकने लिस्टिंगच्या दिवशी 1400 रुपये उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. आज गुरूवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 0.55 टक्के वाढीसह 1,207.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सने 1400 रुपये किंमत पातळी स्पर्श केल्यापासून शेअरमध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. 1 डिसेंबर 2023 ते 4 डिसेंबर 2023 दरम्यानच्या घसरणीनंतर, टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 1150 रुपये किमतीवर आला आणि पुन्हा शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. त्यानंतर टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 1270 रुपये किमतीच्या आसपास पोहोचला होता.
1 डिसेंबर 2023 रोजी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळाली होती. या दिवशी शेअरची किंमत 1348 रुपयेवरून घसरून 1212 रुपये किमतीवर आली होती. टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक दैनिक चार्टवर अधिक नफा वसुलीचे संकेत देत आहे.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा टेक कंपनीचे शेअर्स 1234 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र दैनिक चार्टनुसार 1220 रुपये किंमत पातळीच्या खाली या स्टॉकमध्ये मोठी घसरण पाहायला मिळू शकते. वरच्या दिशेने जाण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉकला 1280 रुपयेची पातळी ओलांडणे खूप गरजेचे आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Technologies Share Price NSE 21 December 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं