Tata Technologies Share Price | मालामाल करणाऱ्या टाटा टेक्नॉलॉजी शेअर्समध्ये वाढीचे संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?

Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या निवेदनात माहिती दिली आहे की, टाटा टेक्नॉलॉजी आणि जर्मनीस्थित बीएमडब्ल्यू ग्रुपने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी एक संयुक्त उपक्रम स्थापन करण्याचा करार केला आहे. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
त्यामुळे टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 1,127.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 0.55 टक्के वाढीसह 1,098 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या निवेदनात माहिती दिली आहे की, कंपनी ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. यामध्ये प्रीमियम वाहनांसाठी सॉफ्टवेअर आधारित ऑटोमोटिव्ह सोल्यूशन्स आणि कॉर्पोरेट IT साठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोल्यूशन्स सेवा प्रदान करण्याचा समावेश आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनी आणि BMW ग्रुप यांच्यात होणारे सहकार्य ऑटोमोटिव्ह इंजिनीअरिंग आणि डिजिटल सोल्यूशन्समधील नावीन्य आणि उत्कृष्टतेची सामायिक दृष्टी प्रतिबिंबित करते.
या संयुक्त उपक्रम अंतर्गत ज्या नवीन कंपनीची स्थापना केली जाणार आहे, त्यात दोन्ही कंपनीचा वाटा 50 टक्के असेल. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने माहिती दिली की, ते सुरुवातीला हा संयुक्त उपक्रम आपली संपूर्ण मालकीची उपकंपनी म्हणून सुरू करतील. त्यानंतर BMW गृप या युनिटमध्ये इक्विटी शेअरच्या माध्यमातून 50 टक्के भाग भांडवल खरेदी करेल.
ही सकारात्मक बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर टाटा टेक कंपनीचे शेअर्स अचानक तेजीत आले होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1049 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सुरुवातीच्या काही तासात हा स्टॉक 1127 रुपये किमतीवर पोहचला होता. आणि दिवसा अखेर या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह क्लोज झाले होते.
मागील 14 ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. डिसेंबर 2023 नंतर या कंपनीचे शेअर्स 1200 रुपये किमतीच्या खाली ट्रेड करत आहेत. 30 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 500 रुपये या आपल्या IPO इश्यू किंमतीच्या तुलनेत 140 टक्के वाढीसह 1200 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. त्याच दिवशी या कंपनीच्या शेअर्सने 1400 रुपये किंमत स्पर्श केली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Technologies Share Price NSE Live 03 April 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं