Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्समध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, तज्ज्ञांनी पुढची टारगेट प्राइस जाहीर केली

Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणूकदारांना श्रीमंत करणार IPO ठरला आहे. या IPO ने गुंतवणुकदारांना अक्षरशः लॉटरीसारखा फायदा कमावून दिला आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO स्टॉकची इश्यू किंमत 500 रुपये होती, मात्र या कंपनीचा शेअर 1200 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला आहे.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा स्टॉक लिस्टिंगच्या पहील्याच दिवशीच 1400 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या IPO स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 180 टक्के नफा कमावून दिला आहे. मात्र नंतर प्रॉफिट बुकींगमुळे या कंपनीचे शेअर्स किंचित घसरणी सह खाली आले आहेत. आज शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 0.75 टक्के वाढीसह 1,184.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या स्टॉकमध्ये लिस्टिंगच्या दिवशी 1400 रुपये ही आपली उच्चांक किंमत पातळी गाठल्यानंतर किंचित घसरण पाहायला मिळाली होती. मात्र आता हा स्टॉक पुन्हा तेजीत वाढतोय. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1200 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांच्या मते, स्टॉक खरेदीसाठी 1183 रुपये किंमत योग्य आहे.
टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक आपल्या दैनिक चार्टवर डब्ल्यू पॅटर्न तयार करत आहे. मजबूत घसरणीनंतर, कोणताही स्टॉक वर जाण्यापूर्वी कन्सोलिडेशनच्या टप्प्यातून जातो. यानंतर चार्टवर डबल बॉटम फॉरमॅट बनवल्यानंतर आणि वरच्या लेव्हलकडे आल्यावर, शेअरचा ग्राफ W पॅटर्न तयार करतो. यालाच शेअर बाजारातील गुंतवणुकदार ब्रेकआउट पॅटर्न म्हणतात.
सध्या ही सर्व उलाढाल टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या स्टॉक चार्टवर पाहायला मिळत आहे. जर टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1255 रुपये किमतीच्या पार गेले तर हा स्टॉक दैनंदिन चार्टवर त्याचा डब्ल्यू पॅटर्न पूर्ण करेल. आणि शेअर अपसाइड ब्रेकआउट देईल. जर या स्टॉकने ब्रेकआउट दिला तर अल्पावधीत शेअरची 12 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. म्हणजेच टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक अल्पावधीत 1350 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Technologies Share Price NSE Live 29 December 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं