TCS Share Price | टीसीएस शेअर्समध्ये बंपर उसळी पाहून तज्ज्ञ उत्साही, डिव्हीडंड देखील जाहीर, खरेदी करावा?

TCS Share Price | टीसीएस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी टीसीएस कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. म्हणून आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे.
डिसेंबर 2023 तिमाहीत टीसीएस कंपनीचा निव्वळ नफा 8.2 टक्के वाढला आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत टीसीएस कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तुलनेत 8.2 टक्के वाढून 11,735 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर या तिमाहीत टीसीएस कंपनीने 4 टक्के वाढीसह 60583 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
टीसीएस ही आयटी कंपनी टाटा समूहाची ही सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीने आपल्या तिमाही निकालांसोबतच शेअर धारकांना प्रति शेअर 27 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी टीसीएस स्टॉक 3.92 टक्के वाढीसह 3,881.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
टीसीएस कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र शेअरधारकांना 18 रुपये प्रति शेअर विशेष लाभांश आणि 9 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. टीसीएस स्टॉक गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित वाढीसह 3,726.70 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तिमाही आधारावर, टीसीएस कंपनीच्या महसुलात 1.5 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मात्र कंपनीचा निव्वळ नफा 2.5 टक्के घसरला आहे.
मागील तिमाहीत TCS कंपनीला एका कायदेशीर दाव्याची सेटलमेंट करण्यासाठी 958 कोटी रुपये द्यावे लागले होते. याचा परिणाम कंपनीच्या तिमाही कामगिरीवर झाला आहे. टीसीएस कंपनीच्या व्यवसायातील एकूण वाढ, संसाधने आणि उपयुक्तता, उत्पादन, जीवन विज्ञान आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील चांगल्या कामगिरीमुळे कंपनीला फायदा झाला आहे.
डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन 0.5 टक्क्यांनी वाढून 25 टक्क्यांवर गेले आहे. तर कंपनीचा निव्वळ मार्जिन 19.4 टक्के होता. टीसीएस कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार सध्या 8 . 1 बिलियन डॉलर्स आहे. टीसीएस कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्यासाठी 19 जानेवारी हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे. हा अंतरिम लाभांश आणि विशेष लाभांश शेअरधारकांना 5 फेब्रुवारी रोजी वाटप केला जाईल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | TCS Share Price NSE Live 12 January 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं