TCS Share Price | टीसीएस कंपनीबाबत फायद्याची अपडेट, TCS शेअरवर काय परिणाम होणार?

TCS Share Price | बुधवारी भारतीय शेअर बाजारात कमालीची घसरण पाहायला मिळाली होती. तर आज देखील शेअर बाजार किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत होता. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात प्रचंड घसरण असताना TCS कंपनीचे शेअर्स 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 3878 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. टीसीएस या टाटा समूहाचा भाग असलेल्या आयटी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 14.02 लाख कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी टीसीएस स्टॉक 0.45 टक्के वाढीसह 3,902 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
टीसीएस कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3965 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 3070 रुपये होती. मागील 6 महिन्यांत टीसीएस कंपनीच्या शेअर्सची किंमत फक्त 11 टक्के वाढली आहे. मागील 1 वर्षात या आयटी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. 19 एप्रिल 2023 रोजी टीसीएस स्टॉक 3089 रुपये या नीचांक किंमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी या किमतीवर स्टॉक खरेदी केला होता, त्यांना 25 टक्के प्रॉफिट मिळाला आहे.
कोरोना महामारी काळात 3 एप्रिल 2020 रोजी टीसीएस कंपनीचे शेअर्स 1654 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीवर ज्या लोकांनी टीसीएस स्टॉक खरेदी केला होता, त्यांचे पैसे 150 टक्क्यांनी वाढले आहे. TCS कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत AI मध्ये मोठी गुंतवणुक करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर टीसीएस कंपनी ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत जगातील दुसरी सर्वात मोठी IT कंपनी बनली आहे.
टीसीएस कंपनीने मागील काही वर्षात मजबूत कामगिरी केली आहे. टीसीएस या भारतातील सर्वात मोठ्या IT कंपनीने AI मध्ये मोठी गुंतवणूक केली. आणि त्यानंतर कंपनीची ब्रँड व्हॅल्यू आता 19.5 बिलियन डॉलर्सवर पोहचली आहे. जगात ब्रँड मूल्याच्या बाबतीत एक्सचेंजर कंपनी पहिल्या क्रमांकावर येते. तिचे एकूण ब्रँड मूल्य 4050.2 कोटी डॉलर आहेत. TCS कंपनी ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत 1916.1 कोटी डॉलरवर आहे. तर Infosys कंपनीची जागतिक ब्रँड व्हॅल्यू 1404.01 कोटी डॉलर आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | TCS Share Price NSE Live 18 January 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं