TCS Share Price | भरवशाचा टीसीएस शेअर! तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, जाहीर केली टार्गेट प्राईस, फायदा घेण्यासाठी डिटेल्स तपासा

TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी टीसीएस कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. केआर चोकसी फर्मच्या मते, पुढील काळात TCS कंपनीचे शेअर्स 3915 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सध्या गुंतवणुकदार टीसीएस स्टॉक खरेदी करून अल्पावधीत 400 रुपये नफा कमवू शकतात. आज मंगळवार दिनांक 18 जुलै 2023 रोजी टीसीएस कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के वाढीसह 3,496.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
दिग्गज ब्रोकरेज फर्मने जाहीर केलेल्या अहवालानुसार TCS कंपनीचे शेअर्स FY2023-24 मध्ये 26.5x / 23.1x च्या P/E मल्टिपलवर ट्रेड करत आहे. अनेक आर्थिक अडचणी आणि जागतिक अनिश्चितता असूनही TCS कंपनी आयटी उद्योगात सकारात्मक मार्जिन वितरीत करत आहे. टीसीएस कंपनीचा आकार, स्थिर बाजार नेतृत्व स्थिती, सर्वोत्तम मालमत्ता वर्ग कामगिरी आणि ऑर्डर बुक यामुळे कंपनीचा परतावा गुणोत्तर देखील सकारात्मक पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते टीसीएस कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 3,915 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
टीसीएस कंपनीच्या शेअरचा FY25 साठी अंदाजित P/E गुणोत्तर 27.0x पट असून च्या EPS प्रमाण 145.0 टक्के आहे. टीसीएस स्टॉकचा EPS हा CMP पेक्षा 16.7 टक्के अधिक आहे. तज्ञांनी आपल्या अहवालात टीसीएस कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये पहिल्या जून तिमाहीत टीसीएस कंपनीने 5,27,580 दशलक्ष महसूल संकलित केला आहे. Q०Q कंपनीच्या महसुलात 0.4 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. डॉलरमध्ये पाहिले तर आपल्या समजेल की, टीसीएस कंपनीने 6780 दशलक्ष डॉलर्स इतका संकलित केला आहे. ज्यात 6.6 टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे.
जून 2023 तिमाहीमध्ये टीसीएस कंपनीने 1,37,550 दशलक्ष EBITA मार्जिन नोंदवला आहे. ज्यात वार्षिक आधारावर 12.9 टक्के सुधारणा पाहायला मिळाली आहे. मात्र तिमाही आधारावर EBITA मार्जिन 5.0 टक्के घसरला आहे. कंपनीच्या ऑपरेटिंग मार्जिनमध्ये वार्षिक आधारावर 6 अंकांची सुधारणा पाहायला मिळाली आहे.
तर Q०Q आधारावर 132 अंकांची घसरण पाहायला मिळाली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या जून तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 16.8 टक्के वार्षिक वाढ झाली असून कंपनीने 1,11,200 दशलक्ष नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीचा PAT मार्जिन 18.7 टक्के नोंदवला गेला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | TCS Share Price today on 18 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं