TCS Shares Buyback | टीसीएस शेअर्स बायबॅक! मजबूत फायदा मिळणार, मागील 5 वर्षाचा बायबॅक रेकॉर्ड जाणून घ्या

TCS Shares Buyback | भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीसीएस कंपनीचा शेअर बायबॅक 1 डिसेंबर 2023 पासून खुला झाला आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना पैसे कमावण्याची मोठी संधी मिळणार आहे. टीसीएस कंपनीचा बायबॅक 7 डिसेंबर 2023 रोजी बंद होईल.
या बायबॅकचा आकार 17000 कोटी रुपये असून, त्या अंतर्गत कंपनी आपले 4.09 कोटी शेअर्स म्हणजेच जवळपास 1.12 टक्के भाग भांडवल स्टेक बायबॅक करणार आहे. कंपनीने या बायबॅकची रेकॉर्ड तारीख 25 नोव्हेंबर 2023 निश्चित केली होती. शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी टीसीएस कंपनीचे शेअर्स 0.70 टक्के वाढीसह 3,512 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीमध्ये, टीसीएस कंपनीने कळवले आहे की, हा बायबॅक 4150 रुपये प्रति शेअर किमतीवर केला जाणार आहे. म्हणजेच टीसीएस स्टॉक रेकॉर्ड तारखेच्या बंद किंमतीपेक्षा 20 टक्के जास्त किमतीवर खरेदी केला जाणार आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी टीसीएस कंपनीचे शेअर 3500 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
7 जानेवारी 2023 रोजी टीसीएस कंपनीने 18000 कोटी रुपये मूल्याचे शेअर बायबॅक जाहीर केले होते, ज्यात कंपनीने आपले 1.08 टक्के इक्विटी शेअर्स खुल्या बाजारातून पुन्हा खरेदी केले होते. मागील 5 वर्षांत टीसीएस कंपनीने केलेली ही पाचवी बायबॅक योजना असणार आहे.
टीसीएस कंपनीचा 5 वर्षांचा शेअर बायबॅक रेकॉर्ड :
11 ऑक्टोबर 2023 : 17000 कोटी रुपये/ 1.12 टक्के
7 जाने 2022 : 18000 कोटी रुपये/ 1.08 टक्के
5 ऑक्टो 2020 : 16000 कोटी रुपये/ 1.42 टक्के
12 जून 2018 : 16000 कोटी रुपये/ 1.99 टक्के
16 फेब्रुवारी 2017 : 16205 कोटी रुपये/ 2.85 टक्के
मागील 5 वर्षांचा टीसीएस कंपनीच्या शेअर बायबॅकमधील बायबॅक किंमत आणि बायबॅक प्रीमियम टक्केवारी
11 ऑक्टोबर 2023 : 4150 रुपये प्रति शेअर / 20 टक्के
7 जानेवारी 2022 : 4500 रुपये प्रति शेअर/ 16.8 टक्के
5 ऑक्टोबर 2020 : 3000 रुपये प्रति शेअर/ 18.9 टक्के
12 जून 2018 : 2100 रुपये प्रति शेअर/ 20.3 टक्के
16 फेब्रुवारी 2017 : 2850 रुपये प्रति शेअर/ 18 टक्के
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | TCS Shares Buyback 02 December 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं