Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी

Titagarh Rail Systems Share Price | टिटागढ रेल सिस्टीम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 176 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 12 महिन्यांत या कंपनीचे शेअर 1,475 रुपये किमतीवर जाऊ शकतात. मार्च 2024 तिमाहीत टिटागढ रेल सिस्टीम कंपनीने 79 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला. ( टिटागढ रेल सिस्टीम कंपनी अंश )
वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात 64 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील वर्षी मार्च तिमाहीत टिटागढ रेल सिस्टीम कंपनीने 48.20 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आज शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये टिटागढ रेल सिस्टीम स्टॉक 5.06 टक्के वाढीसह 1,273.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मार्च 2024 तिमाहीत टिटागढ रेल सिस्टीम कंपनीने 8 टक्के वाढीसह 1,052.4 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 974.20 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. चालू आर्थिक वर्षात टिटागढ रेल सिस्टीम कंपनी बंगळुरू, सुरत आणि अहमदाबाद मेट्रो रेल्वे डब्यांचे काम पूर्ण करेल, आणि दर महिन्याला 950-1,000 वॅगन्सची डिलिव्हरी करेल.
टिटागढ रेल सिस्टीम कंपनीचा EBITDA मार्जिन वार्षिक आधारावर 160 बेसिस पॉइंट्सने वाढून 11.4 टक्के नोंदवला गेला आहे. मार्च तिमाहीत कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 28,100 कोटी रुपये होता, त्यापैकी 14,800 कोटी रुपये मूल्याचे काम पुढील तीन-पाच वर्षांत कार्यान्वित होणार आहेत. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 1227.15 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर गुरुवारी हा स्टॉक 1,212.70 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
नुवामा फर्मच्या तज्ञांच्या मते, टिटागढ रेल सिस्टीम स्टॉकमध्ये पुढील काळात 22 टक्के वाढ होऊ शकते. सिस्टेमॅटिक्स इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने टिटागढ रेल सिस्टीम स्टॉकची रेटिंग ‘बाय’ वरून अपग्रेड करून ‘होल्ड’ केली आहे. नुवामा फर्मच्या तज्ञांच्या मते, टिटागड रेल सिस्टीम कंपनीचा वॅगन विभाग पूर्ण क्षमतेने काम करत आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीला दरमहा 950-1,000 वॅगन्सचे उत्पादन करायचे आहे. सध्या कंपनीकडे 13,300 कोटी रुपये मूल्याच्या दीर्घकालीन ऑर्डर आहेत.
मार्च 2024 तिमाहीत टिटागढ रेल सिस्टीम कंपनीला भारतीय रेल्वेने 4,463 BOSM वॅगनचे उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठी 1,910 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती. कंपनीने पुणे मेट्रो रेल्वे कोच ऑर्डर पूर्ण केली आहे. आता कंपनी बेंगळुरू मेट्रो रेल्वे कोच ऑर्डरवर काम सुरू करणार आहे. अहमदाबाद आणि सुरत मेट्रो रेल्वे कोच ऑर्डरवर या आर्थिक वर्षाच्या अखेरीस काम सुरू होण्याची शक्यता आहे. टिटागढ रेल सिस्टीम कंपनीला आर्थिक वर्षीच्या अखेरीस दर महिन्याला 15-20 कोचचे उत्पादन होणे अपेक्षित आहे. ऑपरेटिंग लीव्हरेजमुळे टिटागढ रेल सिस्टीम कंपनीच्या प्रवासी कोच विभागातील मार्जिन 10 टक्क्यांनी वाढेल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Titagarh Rail Systems Share Price NSE Live 18 May 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं