Titagarh Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करतोय, शेअर्समध्ये जोरदार तेजी, नवीन ऑर्डर मिळताच खरेदीला गर्दी

Titagarh Share Price | टीटागड रेल सिस्टीम या रेल्वे क्षेत्राशी निगडीत कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीला नुकताच केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने एक मोठी ऑर्डर दिली आहे. टीटागड रेल सिस्टीम कंपनीला केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने 250 स्पेशल वॅगन बनवण्याचे काम दिले आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 170 कोटी रुपये आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी कंपनीला 36 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. आज सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी टीटागड रेल सिस्टीम स्टॉक 3.15 टक्के वाढीसह 987.90 रुपये किंमतीवर क्लोज झाले आहे.
मागील महिन्यात टीटागड रेल सिस्टीम कंपनीने दिल्लीस्थित अंबर ग्रुप कंपनीसोबत एक करार केला होता. या करारानुसार भारत आणि युरोप या दोन्ही देशांमध्ये आपली उपस्थिती वाढवण्याच्या उद्देशाने या दोन्ही कंपन्यांनी SPV ची स्थापना केली आहे.
टीटागड रेल सिस्टीम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, युरोपीय देशांत नवीन व्यावसायिक संधी शोधण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. या दोन्ही कंपन्या आपल्या उपकंपनीच्या माध्यमातून भारत आणि युरोपियन युनियनमध्ये तंत्रज्ञान प्रणाली आणि ट्रेन इंटीरियरच्या निर्मिती कामावर लक्ष केंद्रित करणार आहे.
टिटागड रेल कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.76 टक्के वाढीसह 956.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील सहा महिन्यांत टीटागड रेल सिस्टीम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 44.13 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये 104.04 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. 20 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1249 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 23 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 203 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत टीटागड रेल सिस्टीम कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत 91.3 टक्के वाढून 75.03 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच तिमाहीत कंपनीने 39.22 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
या तिमाहीत कंपनीने 954.68 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 766.4 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. टीटागड रेल सिस्टीम ही कंपनी मुख्यतः प्रवासी आणि मालवाहतूक अशा दोन्ही क्षेत्रात रेल्वे वाहने पार्टस, प्रवासी कोच आणि मेट्रो कोच यासह मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदान करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Titagarh Share Price NSE Live 19 February 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं