Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS

Trident Share Price | स्टॉक मार्केटमधील अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात परतावा (NSE: TECHLABS) दिला आहे. ट्रायडेंट टेकलॅब्स लिमिटेड कंपनी शेअरने देखील गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. ट्रायडेंट टेकलॅब्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने अवघ्या 11 महिन्यांत गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. (ट्रायडेंट टेकलॅब्स कंपनी अंश)
शेअर प्राईस बँड 35 रुपये होती
सोमवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.92% टक्के वाढून 902 रुपयांवर पोहोचला होता. ट्रायडेंट टेकलॅब्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लाँच झाला होता. त्या आयपीओ वेळी शेअर प्राईस बँड 35 रुपये होती. ट्रायडेंट टेकलॅब्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 35 रुपयांच्या इश्यू किमतीवरून 2300 टक्क्यांनी वाढले आहेत. ट्रायडेंट टेकलॅब्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 998 रुपये असून शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 93.25 रुपये आहे.
IPO च्या पहिल्याच दिवशी 194% परतावा दिला होता
ट्रायडेंट टेकलॅब्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ 21 डिसेंबर 2023 रोजी लाँच करण्यात आला होता. आयपीओमध्ये ट्रायडेंट टेकलॅब्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची प्राईस बँड 35 रुपये निश्चित करण्यात आली होती. IPO सूचिबद्ध होण्याच्या पहिल्या दिवशीच गुंतवणूकदारांना 180% परतावा दिला होता. अवघ्या ११ महिन्यात या शेअरने गुंतवणूदारांना 2300% परतावा दिला आहे.
आयपीओ 763 पट सबस्क्राइब झाला होता
ट्रायडेंट टेकलॅब्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ 763.30 पट सबस्क्राइब झाला होता. ट्रायडेंट टेकलॅब्स लिमिटेड कंपनीच्या आयपीओमध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा भाग 1059.43 पट, NII गुंतवणूकदारांचा भाग 854.37 पट आणि पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा भाग 117.91 पट सबस्क्राइब झाला होता. रिटेल गुंतवणूकदार ट्रायडेंट टेकलॅब्स लिमिटेड कंपनीच्या आयपीओमध्ये केवळ एका लॉटसाठी गुंतवणूक करू शकणार होते. ट्रायडेंट टेकलॅब्स लिमिटेड कंपनीच्या आयपीओच्या एका लॉटमध्ये 4000 शेअर्स होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Trident Share Price 18 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं