Ugro Capital Share Price | अल्पावधीत मालामाल करणार हा शेअर, मिळेल 60% परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग

Ugro Capital Share Price | उग्रो कॅपिटल कंपनीने नुकताच विद्यमान गुंतवणूकदारांना अनिवार्य परिवर्तनीय डिबेंचर आणि वॉरंट इश्यू करून 1,322 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. उग्रो कॅपिटल ही एक एक नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी आहे. उग्रो कॅपिटल कंपनीने मार्च 2024 तिमाहीत वर्ष-दर-वर्ष आधारावर निव्वळ नफ्यात 132.83 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. याकाळात कंपनीने 32.69 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ( उग्रो कॅपिटल कंपनी अंश )
मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत कंपनीने 14.04 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कंपनीचे एकूण व्याज उत्पन्न 36 टक्क्यांनी वाढून 191.77 कोटी रुपयेवर पोहोचले आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत कंपनीचे व्याज उत्पन्न 141.11 कोटी रुपये नोंदवले गेले होते. आज शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी उग्रो कॅपिटल स्टॉक 0.25 टक्के घसरणीसह 279.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.
मार्च 2023 तिमाहीत उग्रो कॅपिटल कंपनीची मालमत्ता अंडर मॅनेजमेंट म्हणजे AUM 6,081 कोटी रुपये होते. जे मार्च 2024 मध्ये कंपनीचे AUM प्रमाण 48 टक्क्यांनी वाढून 9,000 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये उग्रो कॅपिटल या NBFC कंपनीने निव्वळ नफ्यात 200 टक्के वाढ नोंदवली आहे. याकाळात कंपनीने 119.34 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीचे व्याज उत्पन्न 46.60 टक्क्यांनी वाढून 707.94 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.
नुकताच उग्रो कॅपिटल कंपनीने नवीन आणि विद्यमान गुंतवणूकदारांना अनिवार्य परिवर्तनीय डिबेंचर आणि वॉरंट वाटप करून 1,322 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. गुरुवारी उग्रो कॅपिटल कंपनीचे शेअर एक टक्के वाढीसह 282 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,600 कोटी रुपये आहे. सेंट्रम सिक्युरीटी फर्मने उग्रो कॅपिटल स्टॉक 440 रुपये या टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
उग्रो कॅपिटल कंपनीने आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, त्यांनी स्टॉक-आणि-कॅश डीलच्या माध्यमातून फिनटेक कर्ज देणारी स्टार्टअप कंपनी MyShubhLife (MSL) 45 कोटी रुपये किमतीवर खरेदी केली आहे. अलीकडील अनेक आर्थिक घडामोडी उग्रो कॅपिटल कंपनीच्या पुढील व्यावसायिक उद्दिष्टांवर प्रकाश टाकतात. आणि भविष्यातील आर्थिक कामगिरीचे आश्वासन देतात. लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट्स अँड सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी उग्रो कॅपिटल स्टॉकवर 350-380 टारगेट प्राइस निश्चित केली आहे.
कीनोट कॅपिटल फर्मच्या तज्ञांच्या मते, उग्रो कॅपिटल कंपनी आपली उच्च वाढीची कामगिरी अशीच सुरू ठेवण्याची आणि 20,000 कोटी रुपये AUM चे लक्ष्य साध्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे तज्ञांनी उग्रो कॅपिटल कंपनीचे शेअर्स 319 रुपये या टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Ugro Capital Share Price NSE Live 24 May 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं