Union Bank of India Share Price | 73 रुपयाचा शेअर तेजीत येणार, बँकेने डिव्हीडंड जाहीर केला, स्टॉक खरेदी करावा का?

Union Bank of India Share Price | ‘युनियन बँक ऑफ इंडिया’ ने शनिवार दिनांक 5 मे 2023 रोजी तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीने 80.57 टक्के वाढीसह 2,811 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. राईट ऑफ लोन वसुलीत मोठी वाढ झाल्याने ‘युनियन बँक ऑफ इंडिया’ च्या नफ्यात मजबूत वाढ झाली आहे.
त्याच वेळी या बँकेच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्रति इक्विटी शेअर 3 रुपये लाभांश वाटपाची घोषणा केली आहे. सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी युनियन बँक ऑफ इंडियाचे शेअर्स 3.27 टक्के घसरणीसह 73.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
युनियन बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने, संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये वार्षिक आधारावर 8,512 कोटी रुपये नफा कमावला आहे. मार्च 2023 तिमाहीत युनियन बँक ऑफ इंडियाचे मूळ निव्वळ व्याज उत्पन्न 21.88 टक्क्यांच्या वाढीसह 8,251 कोटी रुपयेवर पोहचले आहेत.
या कालावधीत बँकेचे अॅडव्हान्स 13 टक्क्यांनी वाढले असून निव्वळ व्याज मार्जिन 2.75 टक्क्यांवरून 2.98 टक्क्यांवर पोहचले आहेत. मार्च 2023 तिमाहीत बँकेचे गैर व्याज उत्पन्न 62.48 टक्क्यांच्या वाढीसह 5,269 कोटी रुपयेवर पोहचले आहे. बंद केलेल्या खात्यांमधून वसुली वार्षिक आधारावर 294 कोटी रुपयांवरून वाढून 2,954 कोटी रुपयेवर पोहचली आहे.
UBI चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ‘ए मणिमेखलाई’ यांनी एका निवेदनात माहिती दिली आहे की, युनियन बँक ऑफ इंडीयाने 2022 23 या आर्थिक वर्षात 15,000 कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य निर्धारित केले होते. परंतु या कालावधीत बँकेने 20,000 कोटींहून अधिक वसूली केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Union Bank of India Share Price today on 08 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं