Union Bank Share Price | सरकारी बँकेचा शेअर 123 रुपये! अल्पावधीत देईल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, फायदा घेणार?

Union Bank Share Price | 2023 या वर्षात PSU सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर्सनी जबरदस्त कामगिरी केली होती. आता नवीन वर्षात देखील हा तेजीचा आलेख अशा वाढत जाईल असे संकेत मिळत आहेत. तज्ञांच्या मते, 2024 या नवीन वर्षात देखील शेअर बाजारातून मजबूत कमाई करण्याच्या संधी निर्माण होणार आहेत.
शेअर बाजारातील तज्ञांनी पुढील एका वर्षाच्या दृष्टीकोनातून गुंतवणूक करण्यासाठी सरकारी बँकेच्या शेअर्सची निवड केली आहे. या बँकेचे नाव आहे, युनियन बँक ऑफ इंडिया. मागील एका वर्षभरात युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया स्टॉक 1.94 टक्के वाढीसह 123.25 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
जेएम फायनान्शिअल फर्मच्या तज्ञांनी युनियन बँक ऑफ इंडिया स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. या बँकेच्या स्टॉकने सप्टेंबर 2023 मध्ये मल्टीवीक ब्रेकआउट दिला होता. त्यावेळी युनियन बँक ऑफ इंडिया शेअर मासिक चार्टवर 100 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. स्टॉकने हा ब्रेकआउट मोठ्या वोल्यूमसह दिला होता.
त्यामुळे युनियन बँक ऑफ इंडिया स्टॉकमध्ये तज्ञांनी पडझडीतही पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 90 रुपये किमतीवर डीप स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या बँकिंग स्टॉकचे एका वर्षासाठीचे पहिले टार्गेट 150 रुपये आणि दुसरे टार्गेट 175 रुपये असू शकते.
मागील एका वर्षभरात युनियन बँक ऑफ इंडिया स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत युनियन बँक ऑफ इंडिया स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी युनियन बँक ऑफ इंडियाचे शेअर 120.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. बँकेच्या एफडीमध्ये 10 वर्षात जो व्याज परतावा मिळतो, तेवढा परतावा हा बँकिंग स्टॉक फक्त 6 महिन्यात देतो. म्हणून फायदा कमावण्यासाठी शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ञ देतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Union Bank Share Price NSE Live 03 January 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं