PLI Scheme for Auto Drone Sectors | वाहनासह ड्रोन उद्योगाकरिता 26,058 कोटींची PLI योजना | केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

नवी दिल्ली, १५ सप्टेंबर | सरकारने उद्योगांना चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने वाहन, वाहनांचे सुट्टे भाग आणि ड्रोन उद्योगाकरिता उत्पादनावर आधारित प्रोत्साहन (PLI) योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना 26,058 कोटी रुपयांची असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
PLI Scheme for Auto Sector, वाहनासह ड्रोन उद्योगाकरिता 26,058 कोटींची PLI योजना, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय – Union cabinet approves rupees 26058 crore PLI Scheme for auto drone sectors :
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माध्यमांशी संवाद साधला. अनुराग ठाकूर म्हणाले, की भारतामधील स्वयंचलित तंत्रज्ञान हे जागतिक पुरवठा साखळीत अधिक प्रगत करण्यासाठी पीएलआय योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अतिरिक्त 7.6 लाख लोकांना रोजगार मिळू शकणार आहे. पीएलआय योजनेमुळे देशात उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार आहे.
पाच वर्षात नव्याने 42,500 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार:
येत्या पाच वर्षांमध्ये वाहन, ड्रोन व वाहनांचे सुट्टे भाग या क्षेत्रांना पीएलआय योजनेमधून 26,058 कोटींची सवलत दिली जाणार असल्याचे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. पीएलआय योजनेमुळे येत्या पाच वर्षात नव्याने 42,500 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. वाहनांची चार्जिंग करण्याकरिता पायाभूत सुविधांची गरज आहे. अशा उद्योगांनाही पीएलआय योजना लागू व्हावी, याची प्रतिक्षा असल्याचे ईवाय इंडियाचे टॅक्स पार्टनर (वाहन क्षेत्र) सौरभ अग्रवाल यांनी सांगितले.
पीएलआय योजनेचा वाहन क्षेत्रातील 10 कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. तर वाहनांच्या सुट्ट्या भागांचे उत्पादन करणाऱ्या 50 कंपन्या आणि 5 नवीन स्वयंचलित गुंतवणूकदार कंपन्यांना फायदा होईल, असा अंदाज अग्रवाल यांनी व्यक्त केला. पीएलआय योजनेमुळे उद्योगांमध्ये तीव्र स्पर्धा होईल, असेही अग्रवाल यांनी सांगितले.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.
News Title: Union cabinet approves rupees 26058 crore PLI Scheme for auto drone sectors.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं