Utkarsh Small Finance Bank Share Price | शेअरची किंमत 53 रुपये, अल्पावधीत देईल 32% परतावा, मालामाल होण्याची संधी

Utkarsh Small Finance Bank Share Price | उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाहीत शानदार कामगिरी केली आहे. या बँकेच्या नवीनतम आर्थिक निकालानुसार बँकेचे सकल कर्ज मागील वर्षीच्या तुलनेत 31.1 टक्के वाढले आहे. 31 मार्च 2024 पर्यंत कंपनीचे सकल कर्ज 18,299 कोटी रुपये होते. या बँकेच्या सकल कर्ज पोर्टफोलिओमध्ये तिमाही आधारावर 11.5 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. ( उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंश )
मागील वर्षीच्या तुलनेत उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या ठेवी 27.4 टक्के वाढीसह 17473 कोटी रुपयेवर गेल्या आहेत. आज सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 1.51 टक्के वाढीसह 53.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या एकूण ठेवींमध्ये तिमाही आधारावर 15.6 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या CASA ठेवींमध्ये देखील मजबूत वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या बँकेचे CASA प्रमाण 25.1 टक्के आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत या बँकेचे CASA ठेवीचे प्रमाण 18.8 टक्के वाढून 3582 कोटी रुपयेवर पोहोचले आहेत. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या किरकोळ मुदत ठेवींमध्येही मागील वर्षीच्या तुलनेत 42.9 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. याशिवाय बँकेच्या मोठ्या मुदत ठेवींमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 12.3 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत बँकेच्या मुदत ठेवीमध्ये 21.7 टक्के वाढ झाली आहे.
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 53.06 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ICICI सिक्युरिटीज फर्मने उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 70 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
8 फेब्रुवारी 2024 रोजी या बँकेचे शेअर्स 68.23 रुपये किंमतीवर ट्रेड करत होते. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा IPO जुलै 2023 रोजी शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या IPO ची इश्यू किंमत 23 ते 25 रुपये प्रति शेअर होती. या बँकेचे शेअर्स 60 टक्के प्रीमियम वाढीसह शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते.
डिसेंबर 2023 तिमाहीत उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या निव्वळ नफ्यात 24 टक्के वाढ नोंदवली आहे. याकाळात बँकेने 116 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. डिसेंबर 2022 तिमाहीत या बँकेने 93.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. डिसेंबर 2023 तिमाहीत या बँकेचे एकूण उत्पन्न 889 कोटी रुपये नोंदवले गेले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Utkarsh Small Finance Bank Share Price NSE Live 08 April 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं