Vadilal Share Price | दणादण पैसा! वाडीलाल इंडस्ट्रीज शेअरने एका दिवसात 15% परतावा दिला, अप्पर सर्किट तोडणारा शेअर खरेदी करणार?

Vadilal Share Price | वाडीलाल इंडस्ट्रीज या आइस्क्रीम बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स काही दिवसांपासून सुसाट वेगात धावत होते. आज मात्र स्टॉकचा तेजीला ब्रेक लागला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वाडीलाल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स एका दिवसात 15 टक्के वाढीसह 3294.65 रुपये या आपला 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. तर दिवसाअखेरीस स्टॉक 14.73 टक्के वाढीसह 3187 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.14 टक्के घसरणीसह 3,008.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
वाडीलाल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्समध्ये तेजी येण्याचे कारण म्हणजे, बेन कॅपिटल कंपनीने वाडीलाल इंडस्ट्रीजमधील कंट्रोलिंग स्टेक खरेदी करण्यासाठी प्रवर्तकांशी बोलणी करत आहे, अशा बातमीमुळे वाडीलाल एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते.
मीडिया रिपोर्टनुसार वोडीलालचा आईस्क्रीमचा व्यवसाय तब्बल 3,000 कोटी रुपयेचा आहे. बेन कॅपिटलने वाडीलाल कंपनीच्या आइसक्रीम युनिट्सचे विलीनीकरण करण्याचा विचार मांडला आहे. Arpwood फर्मने देखील यापूर्वी वाडीलाल कंपनीमधील भाग भांडवल खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र कंपनीच्या प्रमोटरमधील वादामुळे या प्रस्ताव मंजुरीला उशीर झाला.
वाडीलाल इंडस्ट्रीज ही कंपनी आईस्क्रीम, फ्लेवर्ड मिल्क, फ्रोझन डेझर्ट, आणि इतर दुग्धजन्य पदार्थ बनविण्यासाठी भारतात प्रसिद्ध आहे. कंपनी खाद्य पदार्थ तसेच थंड पेय ब्रँड देखील हाताळते. वाडीलाल इंडस्ट्रीज कंपनी गोठवलेली फळे, भाज्या, फ्रूट जॅम उत्पादने, अन्न उत्पादनांवर प्रक्रिया आणि निर्यात करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. वाडीलाल इंडस्ट्रीज कंपनीचे दोन मोठे आइस्क्रीम उत्पादन युनिट सध्या चालू आहेत. कंपनीचा एक युनिट गुजरात आणि दुसरा युनिट उत्तर प्रदेश राज्यात चालू आहे.
वाडीलाल इंडस्ट्रीज ही कंपनी गुजरात राज्याच्या धरमपूर, वलसाड येथील कारखान्यात फ्रोजन फ्रूट, भाज्या आणि खाद्यपदार्थावर प्रक्रिया करण्याचे काम पार पाडते. तर दुसरीकडे वाडीलाल एंटरप्रायझेस ही कंपनी गोठविलेल्या अन्न उत्पादनांचे निर्यात करण्याचा व्यवसाय हाताळते.
वाडीलाल इंडस्ट्रीज कंपनीच्या उत्पादन श्रेणीमध्ये भाज्या, फळे, फळांचे जॅम, RTS, रोटी, परांठे, स्नॅक्स, तयार जेवण, तयार मिक्स फ्रूट असे अनेक पदार्थ सामील आहेत. फळे, आणि फ्रूट जॅम, भाजीपाला यांसारख्या कॅन केलेला पदार्थ कंपनी विदेशात निर्यात देखील करते. याशिवाय वाडीलाल इंडस्ट्रीज कंपनी फ्रूट कॉकटेल, पेरूचा हलवा आणि आंब्याचे कापही देखील बाजारात विकते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Vadilal Share Price today on 11 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं