Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉकबाबत ब्रोकरेज रिपोर्ट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price | नकारात्मक जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात बुधवारी घसरण पाहायला मिळाली. बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक घसरले होते. बुधवारी निफ्टी घसरणीसह 25000 च्या जवळ आला होता. तर सेन्सेक्समध्ये 150 अंकांची घसरण झाली होती.
दर्जेदार शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी
दिवाळीपूर्वी स्टॉक मार्केटमध्ये उलथापालथ सुरू आहे. सणासुदीच्या वातावरणात दीर्घकालीन दृष्टिकोनातून दर्जेदार शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे. दिवाळी इन्व्हेस्टमेंट आयडियाजमध्ये दररोज निवडक शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ देत आहेत.
टॉप ब्रोकरेज फर्मचे रिपोर्ट
टॉप ब्रोकरेज कंपन्यांनी बीएसई लिमिटेड, पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेड, भारती एअरटेल लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, व्होडाफोन आयडिया लिमिटेड शेअर्सबाबत रिपोर्ट जारी केला आहे. पुढे जाणून घ्या या शेअर्सबद्दल ब्रोकरेज फर्मचे काय मत आहे.
जेफरीज ब्रोकरेज फर्म – BSE Share Price
* रेटिंग – अंडरपरफॉर्म
* टार्गेट प्राईस – 3500 रुपये
जेफरीज ब्रोकरेज फर्म BSE शेअरला ‘अंडरपरफॉर्म’ रेटिंग दिली आहे. तसेच टार्गेट प्राईस सुद्धा २८५० रुपयांवरून ३५०० रुपये केली आहे. BSE लिमिटेड कंपनीचा बाजारातील हिस्सा वाढल्याने मूल्यांकनातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
CLSA ब्रोकरेज फर्म – PVR Inox Share Price
* रेटिंग – आऊटपरफॉर्म
* टार्गेट प्राईस – 2450 रुपये
CLSA ब्रोकरेज फर्मच्या मते या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे उत्पन्न आणि EBITDA अंदाजापेक्षा जास्त सकारात्मक आहे. आर्थिक वर्ष 2025-27 साठी उत्पन्न/EBITDA अंदाजात 4% – 9% घट होईल असं ब्रोकरेजेने म्हटले आहे. PVR आयनॉक्स लिमिटेड कंपनीने पहिल्या सहामाहीत १,७४५ स्क्रीन्स, ६६ नवीन स्क्रीन्सची भर घातली आहे असं ब्रोकरेजेने रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
HSBC ब्रोकरेज फर्म – Bharti Airtel Share Price
* रेटिंग – BUY
* टार्गेट प्राईस – 1950 रुपये
HSBC ब्रोकरेज फर्मने भारती एअरटेल शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तसेच टार्गेट प्राईस 1325 रुपयांवरून 1950 रुपये केली आहे. आर्थिक वर्ष 2024-27 दरम्यान EBITDA/EPS 16% /17% CAGR दराने वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. EBITDA/EPS मोबाइल ARPU वाढ, ब्रॉडबँड ग्राहकांची वाढही चांगली असल्याचं ब्रोकरेज रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
HSBC ब्रोकरेज फर्म – Reliance Share Price
* रेटिंग – Hold
* टार्गेट प्राईस – 3010 रुपये
HSBC ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टमध्ये, घरगुती ब्रॉडबँडमधील संधींचा फायदा घेण्यासाठी जिओ चांगल्या स्थितीत असल्याचे म्हटले आहे. जिओला आर्थिक वर्ष २०३० पर्यंत होम ब्रॉडबँडमधील ४५ टक्के मार्केट शेअर मिळण्याची शक्यता ब्रोकरेजने व्यक्त केली आहे. आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत होम ब्रॉडबँडमधील जिओचा मार्केट शेअर सध्या २८ टक्के आहे असं देखील रिपोर्ट मध्ये म्हटलं आहे.
HSBC ब्रोकरेज फर्म – Vodafone Idea Share Price
* रेटिंग – Reduce
* टार्गेट प्राईस – 7.10 रुपये
HSBC ब्रोकरेज फर्मने वोडाफोन आयडिया शेअरला ‘Reduce’ रेटिंग दिली आहे. तसेच टार्गेट प्राईस 7.10 रुपये केली आहे. वोडाफोन आयडिया शेअरबाबत महागडे मूल्यांकन आणि उच्च लीव्हरेजमुळे ही रेटिंग देण्यात आली आहे. वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीवरील इक्विटी डिल्युशन कमी होण्याचा धोका असल्याचे ब्रोकरेजने म्हटले आहे. तसेच वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीला अनेक प्रकारच्या थकबाकी भराव्या लागणार आहेत असं देखील ब्रोकरेजने म्हटले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 17 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं