Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉकवर अंडरवेट रेटिंग, ₹16 चा शेअर 'BUY' करावा?

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन ग्रुप पुढील आठवड्यात ब्लॉक डीलद्वारे इंडस टॉवर्स कंपनीमधील 2.3 अब्ज डॉलर्स मूल्याचे शेअर्स विकण्याची योजना आखत आहे. व्होडाफोन ग्रुप आपली टेलिकॉम उपकंपनी व्होडाफोन आयडियाचे कर्ज कमी करण्यासाठी ही ब्लॉक डील करणार आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
मीडिया रिपोर्टनुसार व्होडाफोन ग्रुपचा इंडस टॉवर्स कंपनीमध्ये 21.5 टक्के वाटा आहे. याचे एकूण बाजार मूल्य 2.3 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 4.11 टक्क्यांच्या वाढीसह 16.73 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.84 टक्के वाढीसह 16.87 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने व्होडाफोन आयडिया स्टॉक खरेदी करताना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर ‘अंडरवेट’ रेटिंग कायम ठेवली आहे. जेपी मॉर्गनच्या तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया स्टॉक 7 रुपये किमतीवर येऊ शकतो. व्होडाफोन आयडिया कंपनीवर जवळपास 21 अब्ज डॉलर एवढे प्रचंड कर्ज आहे. त्यामुळे 2.3 बिलियन डॉलर्स मूल्याच्या ब्लॉक डीलने व्होडाफोन आयडिया कंपनीचे कर्ज परतफेड होणे कठीण आहे.
मागील एका महिन्यात व्होडाफोन आयडिया स्टॉक 26.26 टक्के वाढला होता. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 121 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत व्होडाफोन आयडिया स्टॉक 90.11 टक्के आणि पाच वर्षांत 33.73 टक्के वाढला आहे.
व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 18.42 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 7.18 रुपये होती. मार्च 2024 तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीला 7675 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. डिसेंबर तिमाहीत या कंपनीचा निव्वळ तोटा 6,419 कोटी रुपये होता.
व्होडाफोन आयडिया कंपनीचा महसूल तिमाही दर तिमाही आधारावर 0.6 टक्क्यांनी घसरून 10,607 कोटी रुपये नोंदवला गेला होता. डिसेंबर तिमाहीत या कंपनीने 10,673 कोटी महसूल संकलित केला होता. व्होडाफोन आयडिया कंपनीचा EBITDA मार्च तिमाहीत 0.3 टक्के घसरणीसह 4,336 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर डिसेंबर तिमाहीत कंपनीचा EBITDA 4,350 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 18 June 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं