Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price | बुधवार, 15 जानेवारी 2025 रोजी व्होडाफोन आयडिया शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली होती. बुधवारच्या ट्रेडिंग दरम्यान व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरने ११ टक्क्यांच्या तेजीसह 9.23 रुपये या ३ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता.
मागील दोन दिवसांत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 19 टक्क्यांची वाढ झाली आहे. शेअरची ही पातळी १७ ऑक्टोबर २०२४ नंतरची उच्चांकी पातळी आहे. व्होडाफोन आयडिया शेअर्समध्ये 52 आठवड्यांच्या 6.60 रुपयांच्या नीचांकी पातळीवरून 39% सुधारणा झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत व्होडाफोन आयडिया शेअर ५० टक्क्यांनी घसरला आहे. लॉन्ग टर्ममध्ये व्होडाफोन आयडिया शेअर सुमारे ९२ टक्क्यांनी घसरला आहे. 17 एप्रिल 2015 रोजी व्होडाफोन आयडिया शेअरची किंमत 118 रुपये होती.
आदित्य बिर्ला ग्रुप आणि व्होडाफोन ग्रुपमधील भागीदारी ही व्होडाफोन आयडिया शेअर्समधील तेजीचे कारण आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीकडे मोठा स्पेक्ट्रम पोर्टफोलिओ आहे, ज्यामध्ये 17 सर्कलमध्ये मिड-बँड 5G स्पेक्ट्रम आणि 16 सर्कलमध्ये एमएमवेव्ह 5G स्पेक्ट्रमचा समावेश आहे.
आपल्या नेटवर्कची कार्यक्षमता वाढविण्यासाठी, व्होडाफोन आयडिया कंपनीने एचसीएल सॉफ्टवेअरशी भागीदारी केली आहे. या तंत्रज्ञानामुळे व्होडाफोन आयडिया कंपनीचे 4G आणि 5G नेटवर्क अधिक स्मार्ट आणि अधिक कार्यक्षम होईल.
एचसीएल टेक्नॉलिजीज कंपनीने स्टॉक मार्केटला माहिती देताना म्हटले आहे की, ‘व्होडाफोन आयडिया कंपनीने आपले 4G आणि 5G नेटवर्क अधिक स्मार्ट आणि अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी एचसीएल सॉफ्टवेअरसोबत भागीदारी केली आहे. एचसीएल टेक्नॉलिजीज कंपनीने पुढे म्हटले आहे की, “व्होडाफोन आयडिया आता आपल्या एरिक्सन आणि सॅमसंग नेटवर्कचे व्यवस्थापन करण्यासाठी मल्टी-व्हेंडर सेल्फ-ऑप्टिमाइझिंग नेटवर्क प्लॅटफॉर्म एचसीएल ऑगमेंटेड नेटवर्क ऑटोमेशन वापरत आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीला नेटवर्कची कामगिरी सुधारण्यास आणि खर्चात बचत होण्यास मदत होईल. त्याच्या थेट फायदा व्होडाफोन आयडिया सर्व्हिस युझर्सना होणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Vodafone Idea Share Price Wednesday 15 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं