Voltas Share Price | टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर! व्होल्टास शेअर्स तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली शेअरची टार्गेट प्राईस

Voltas Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या व्होल्टास कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या तज्ञांनी व्होल्टास कंपनीच्या शेअर्सवर 1000 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. त्याच वेळी प्रभुदास लीलाधर फर्मने व्होल्टास स्टॉकवर 909 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. | Tata Group Shares
तथापि एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने या कंपनीच्या शेअरची किंमत 800 रुपयांपर्यंत घसरण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आज गुरूवार दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी व्होल्टास स्टॉक 0.28 टक्के वाढीसह 819.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
3 मार्च 2023 रोजी व्होल्टास कंपनीचे शेअर्स 933.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. व्होल्टास कंपनीने नुकताच आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत व्होल्टास कंपनीने 36.68 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 595.01 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत व्होल्टास कंपनीने 7.41 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत व्होल्टास कंपनीचा EBITDA 14.51 टक्के घसरणीसह 141.25 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर सप्टेंबर 2022 मध्ये कंपनीचा EBITDA 165.22 कोटी रुपये होता. सप्टेंबर 2023 तिमाहीत कंपनीचा सेल्स 29.65 टक्के वाढीसह 2,292.75 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर सप्टेंबर 2022 मध्ये कंपनीचा सेल्स 1,768.36 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या तज्ञांच्या मते, व्होल्टास कंपनीची सप्टेंबर 2023 तिमाहीची व्यापारी कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी होती. पुढील सणासुदीच्या काळात व्होल्टास कंपनीच्या उत्पादनाच्या मागणीमध्ये वाढण्याची होण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय प्रकल्पांसाठीच्या तरतुदी पुढील तिमाहीत सुरू राहू शकतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Voltas Share Price NSE 26 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं