Waaree Renewable Share Price | वारी रिन्युएबल शेअर खरेदी वेगाने का होतेय? कंपनीला मोठ्या ऑर्डर्स मिळत आहेत प्लस 'ही' बातमी

Waaree Renewable Share Price | वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 14 टक्क्यांचा वाढीसह 1,242 रुपये हा नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. S&P BSE सेन्सेक्स काल 0.13 टक्क्यांच्या घसरणीसह 65,529 अंकावर ट्रेड करत होता. 2023 या वर्षात वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 152.97 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. (Waaree Share Price)
या कालावधीत S&P BSE सेन्सेक्समध्ये 7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 2020 च्या अखेरीस या कंपनीचे शेअर्स 14.40 रुपये किमतीवरून 8,525 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. आज गुरूवार दिनांक 13 जुलै 2023 रोजी वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 3.52 टक्के वाढीसह 1,253.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कंपनीचे ऑर्डर तपशील :
वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीला पाच वर्षांच्या कालावधीसाठी 100 MW क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनी भारतातील अग्रगण्य अक्षय ऊर्जा विकासकांपैकी एक मानली जाते. आदेशाच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीला हा नवीन प्रकल्प आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये पूर्ण करायचा आहे. मागील महिन्याच्या सुरुवातीला वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीला 36 मेगावॅट डीसी क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प बनवण्याचा टर्नकी वर्क ऑर्डर देण्यात आली आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात :
वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी ही कंपनी वारी समूहाचा भाग आहे. वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी ही सोलर ईपीसी क्षेत्रात व्यवसाय करते. वारी ग्रुपने आतापर्यंत 1.2 GW पेक्षा जास्त क्षमतेचे 10000 हून अधिक सौर प्रकल्प यशस्वीरित्या चालू केले आहेत. वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी या उपकंपनीची स्थापना वाढत्या अक्षय ऊर्जा बाजारपेठेमध्ये जागा प्रस्थापित करण्यासाठी झाली होती. वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनी ऑनसाइट सौर प्रकल्प म्हणजेच रूफटॉप आणि ग्राउंड माऊंट आणि ऑफसाइट सोलर फार्म्स म्हणजेच ओपन ऍक्सेस सोलर प्लांट्स असे दोन्ही प्रकारचे प्रकल्प स्थापन करून आपल्या ग्राहकांना स्वच्छ ऊर्जा प्रदान करण्याचे काम करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Waaree Renewable Share Price today on 13 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं