Welspun India Share Price Today | दुहेरी लाभ! 1 लाखावर 39 लाख परतावा देणाऱ्या शेअरवर डिव्हीडंड, प्लस स्टॉक बायबॅक, फायदा घ्या

Welspun India Share Price Today | ‘वेलस्पन इंडिया’ या टेक्सटाईल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. मागील काही वर्षांत ‘वेलस्पन इंडिया’ कंपनीचे शेअर्स 2 रुपयांवरून वाढून 80 रुपयांवर पोहचले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3800 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कापड कंपनीने आपल्या शेअर धारकांना दुहेरी लाभ देण्याची घोषणा केली आहे. कंपनी गुंतवणुकदारांना 10 टक्के लाभांश लाभसह शेअर बायबॅक देखील करणार आहे. (Welspun India Limited)
वेलस्पन इंडिया कंपनीने आपले शेअर्स सध्याच्या बाजार भावाच्या 36 टक्के प्रीमियम किमतीवर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने या बायबॅकसाठी प्रति शेअर 120 रुपये किंमत निश्चित जाहीर केली आहे. कंपनीने बायबॅकसाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 10 मे 2023 हा दिवस निश्चित केला आहे.
28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 88 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. वेलस्पन इंडिया कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 27 एप्रिल 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत 16,250,000 इक्विटी शेअर्स बायबॅक करण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे.
1 लाखावर 39 लाख परतावा :
‘वेलस्पन इंडिया’ कंपनीचे शेअर्स 9 एप्रिल 2009 रोजी 2.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 88 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कालावधीत ‘वेलस्पन इंडिया’ कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 3825 टक्के परतावा लावून दिला आहे.
जर तुम्ही 9 एप्रिल 2009 रोजी वेलस्पन इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 38.93 लाख रुपये झाले असते. वेलस्पन इंडिया कंपनीच्या शेअर्सनी मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 345 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सची किंमत 19.70 रुपयांवरून वाढून 88 रुपयांवर पोहोचली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Welspun India Share Price today on 29 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं