Wipro Share Price | विप्रो शेअरने 1 दिवसात 13 टक्के परतावा दिला, स्टॉकबाबत तज्ज्ञ सकारात्मक, पुढे किती फायदा?

Wipro Share Price | विप्रो या भारतीय आयटी कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यात शानदार कामगिरी केली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या आयटी कंपनीच्या शेअर्सने खळबळ माजवली होती. विप्रो कंपनीचे शेअर्स सोमवारी 13 टक्क्यांच्या वाढीसह 526.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
विप्रो स्टॉकमध्ये ही तेजी डिसेंबर 2023 च्या तिमाही निकालानंतर पाहायला मिळाली होती. मात्र आज गुंतवणूकदार विप्रो स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात नफा वसुली करत आहेत. आज मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी विप्रो स्टॉक 1.66 टक्के घसरणीसह 486.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
विप्रो कंपनीची अमेरिकन डिपॉझिटरी रिसीप्ट 18 टक्क्यांच्या वाढीसह 6.35 डॉलर्स झाली आहे. ही 20 महिन्यांतील सर्वोच्च पातळी आहे. मागील 10 महिन्यांत विप्रो कंपनीच्या शेअर्सची किंमत 50 टक्के पेक्षा जास्त वाढली आहे. मागील 10 महिन्यात विप्रो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. 28 मार्च 2023 रोजी विप्रो कंपनीचे शेअर्स 356.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
15 जानेवारी 2024 रोजी विप्रो स्टॉक 526.45 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 6 महिन्यांत विप्रो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत विप्रो कंपनीचे शेअर्स 415.25 रुपयेवरून वाढून 526.45 रुपये किमतीवर पोहचले आहे. विप्रो कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 351.85 रुपये होती.
चालू आर्थिक वर्षांच्या डिसेंबर 2023 तिमाहीत विप्रो कंपनीने 2694.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या डिसेंबर 2022 तिमाहीच्या तुलनेत या वार्षिक निव्वळ नफ्यात 12 टक्क्यांची घसरण झाली आहे. मागील वर्षीच्या डिसेंबर 2022 तिमाहीत विप्रो कंपनीने 3052.9 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तथापि सप्टेंबर 2023 तिमाहीच्या तुलनेत विप्रो कंपनीच्या निव्वळ नफ्यात मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे.
सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत विप्रो कंपनीने 1646.3 कोटी रुपये नफा कमावला होता. विप्रो कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत 22205.1 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षीच्या डिसेंबर 2022 तिमाहीत या कंपनीने 23290 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत या कंपनीने 22515.9 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Wipro Share Price NSE Live 16 January 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं