Yes Bank Share Price | येस बँक शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: YESBANK

Yes Bank Share Price | मागील ५ दिवसात येस बँक शेअर १० टक्के घसरला आहे. एनएसईम वर येस बँक शेअर २१.५० रुपयांवरून १९.५० रुपयांपर्यंत घसरला (NSE: YESBANK) आहे. दुसऱ्या तिमाहीतील सकारात्मक निकालानंतर स्टॉक मार्केट तज्ज्ञ येस बँक शेअर बाबत उत्साही असल्याचं पाहायला मिळतंय. (येस बँक अंश)
शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.60 टक्के घसरून 19.50 रुपयांवर पोहोचला होता. सोमवार 28 ऑक्टोबर रोजी हा शेअर 7.48 टक्के वाढून 20.83 रुपयांवर पोहोचला होता.
दुसऱ्या तिमाहीचे निकाल
आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत येस बँकेच्या निव्वळ नफ्यात १४५.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत येस बँकेला 553 कोटी रुपये नफा झाला आहे, जो आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत 225.21 कोटी रुपये होता. तसेच वार्षिक आधारावर येस बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न १४.३ टक्क्यांनी वाढून २,२०० कोटी रुपयांवर झाले आहे.
येस बँक शेअर टार्गेट प्राइस
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी येस बँक शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. स्पार्क कॅपिटल ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञ म्हणाले की, ‘येस बँके लिमिटेड शेअर्समध्ये पुढील काही ट्रेडिंग सत्रात विक्री होऊ शकते. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांकडे आधीच येस बँक शेअर्स असतील तर ते ‘HOLD’ करावेत. तसेच 16.90 रुपये स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला देखील दिला आहे. स्पार्क कॅपिटल ब्रोकरेज फर्मने येस बँक शेअरला पहिली २३ रुपये ही टार्गेट प्राईस दिली आहे. तर दुसरी टार्गेट प्राईस २४.८० रुपये दिली आहे.
पहिल्या तिमाहीचे निकाल
पहिल्या तिमाहीत येस बँक लिमिटेडच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर ४६.४९ टक्क्यांनी वाढ झाली होती. येस बँक लिमिटेडने एप्रिल ते जून २०२४ या कालावधीत ५०२.४३ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत येस बँक लिमिटेडचा निव्वळ नफा ३४२.५२ कोटी रुपये होता. पहिल्या तिमाहीत येस बँक लिमिटेडचे उत्पन्न १७.५९ टक्क्यांनी वाढून ८९१८.१४ कोटी रुपये झाले होते.
येस बँक शेअर रेटिंग
ग्लोबल रेटिंग एजन्सी मूडीजने जुलै महिन्यात येस बँक शेअरला ‘पॉझिटिव्ह’ रेटिंग दिली होती. त्याचवेळी इक्रा रेटिंग एजन्सीने ‘निगेटिव्ह’ वरून ‘A’ अशी रेटिंग अपग्रेड केली होती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Yes Bank Share Price 28 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं