Yes Bank Share Price | 23 रुपयाच्या येस बँक शेअर्सबाबत पुढे काय? सकारात्मक हालचालींमुळे तज्ज्ञांनी दिली मोठी अपडेट

Yes Bank Share Price | 2024 या नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. मात्र भारतीय शेअर बाजार किंचित विक्रीच्या दबावात अडकला आहे. असे काही शेअर्स आहेत, जे मंदीच्या भावनेला झटकून तेजीत वाढत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 21.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
आज देखील या बँकिंग स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. येस बँकेने 31 डिसेंबर 2023 रोजी सेबीला माहिती दिली होती की, बँकेला सुरक्षा पावत्या पोर्टफोलिओमध्ये 150 कोटी रुपये मिळाले आहेत. डिसेंबर 2022 मध्ये कर्ज पुनर्रचना करणाऱ्या JC Flowers ARC कंपनीने 48,000 कोटी रुपये मूल्याच्या NPA विक्रीच्या ही रक्कम प्राप्त झाली आहे. आज मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी येस बँक स्टॉक 1.55 टक्के वाढीसह 23 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
येस बँकेने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, बँकेला मिळालेली रक्कम ट्रस्टच्या अंतर्निहित वहन मूल्यापेक्षा जास्त सुधारित सूची नियमांनुसार निर्धारित केलेल्या मर्यादा ओलांडत असल्याने, याची उघड सेबीला कळवली जात आहे. येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 23.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 14.40 रुपये होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक 5.5 टक्क्यांच्या वाढीसह 22.64 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
येस बँकेचे एकूण बाजार भांडवल सध्या 65000 कोटी रुपये आहे. येस बँकेचा JC फ्लॉवर ARC कंपनीमध्ये 9.9 टक्के वाटा आहे. JC Flowers ARC या कंपनीची स्थापना 2015 साली झाली होती. येस बँकेने नोव्हेंबर 2022 मध्ये JC Flowers ARC कंपनीचे 9.9 टक्के भाग भांडवल खरेदी करून मोठी गुंतवणुक केली होती.
मात्र नंतर JC Flowers ARC कंपनीमधील काही कॉर्पोरेट कृतींमुळे येस बँकेचे भाग भांडवल प्रमाण 5.01 टक्क्यांवर आले होते. ऑक्टोबर 2023 मध्ये येस बँकेने पुन्हा एकदा JC Flowers ARC कंपनीचे 2.4 कोटी शेअर्स खरेदी केले आणि आपला वाटा 9.9 टक्केवर नेला.
येस बँक शेअर्सबाबत आता पुढे काय?
येस बँक शेअर्सबाबत आता पुढे काय? टेक्निकल अॅनालिस्ट प्रकाश गाबा यांनी सांगितल्याप्रमाणे, चार्टचा बेस 21 रुपये आहे. उलट हा शेअर 29 रुपयांवर गेला तर शेअर बॉटमआउट जाईल. त्यानंतर शेअर प्राईसचा प्रवास 100 रुपयांच्या दिशेने सुरु होईल. परंतु, त्यासाठी दीर्घकाळ गुंतवणुकीच्या दृष्टीने होल्ड करावा लागेल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Yes Bank Share Price NSE Live 02 January 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं