Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात दुपटीने वाढ, शेअर प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK

Yes Bank Share Price | शनिवार, 25 जानेवारी 2025 रोजी येस बँक लिमिटेडने डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. येस बँक लिमिटेडने स्टॉक एक्स्चेंजला फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ‘चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीमध्ये येस बँक लिमिटेडच्या स्टॅन्डअलोन प्रॉफिटमध्ये वार्षिक आधारावर १६४.६ टक्क्यांची वाढ होऊन तो ६१२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
तसेच ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत येस बँकेचा निव्वळ एनपीए तिमाही-दर-तिमाही आधारावर (क्यूओक्यू) बदल न होता ०.५ टक्क्यांवर स्थिर राहिला आहे. तर क्यूओक्यू आधारावर कोणताही बदल न होता सकल एनपीए १.६ टक्क्यांवर राहिला आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत येस बँकेचा स्टँडअलोन एनआयआय’मध्ये १०.२ टक्क्यांची वाढ होऊन तो २,२२४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच, येस बँक लिमिटेडचा पीपीओपी’मध्ये २४.९ टक्क्यांची वाढ होऊन तो १,०७९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
मात्र ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत येस बँकेच्या सकल आणि निव्वळ एनपीएत किरकोळ वाढ होऊन एकूण एनपीए 3,963.47 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दुसऱ्या तिमाहीत सकल आणि निव्वळ एनपीए 3,889.4 कोटी रुपये होता. येस बँकेने त्यांचे सकल एनपीए गुणोत्तर १.६ टक्के आणि निव्वळ एनपीए गुणोत्तर ०.५ टक्के राखले आहे.
येस बँक शेअर – ब्रोकरेज रेटिंग
एमके फायनान्शिअल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने येस बँक शेअरसाठी ‘SELL’ रेटिंग सह १६ रुपये टार्गेट प्राइस दिली आहे. तसेच आनंद राठी ब्रोकरेज फर्म आणि कोटक ब्रोकरेज फर्मने येस बँक शेअरसाठी ‘SELL’ रेटिंग जाहीर केली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Yes Bank Share Price Saturday 25 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं