Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत चिंता वाढवणारी अपडेट, गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं?

Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून येस बँक चर्चेचा विषय बनली आहे. मीडिया रिपोर्टनुसार येस बँकेच्या शेअर धारकांच्या संख्येत लक्षणीय घट पाहायला मिळाली आहे. तज्ञांच्या मते गुंतवणूकदारांचा येस बँकेवरील विश्वास कमी होत चालला आहे. मागील 6 महिन्यांत येस बँकेच्या शेअर धारकांची संख्या 1.5 लाखांनी कमी झाली आहे.
येस बँकेच्या शेअरधारकांची सख्या 50.6 लाख होती, त्यातून शेअरधारकांची संख्या 1.5 लाख कमी झाली आहे. सप्टेंबर 2023 तिमाहीच्या डेटानुसार येस बँकेच्या शेअर धारकांची संख्या 48,88,441 वर आली आहे. येस बँकेमध्ये 100 टक्के भाग भांडवल सार्वजनिक गुंतवणुकदरांनी धारण केले आहेत. शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी येस बँक स्टॉक 1.99 टक्के घसरणीसह 19.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
मागील सहा महिन्यांत येस बँकेच्या शेअर धारकांची संख्या 1.5 लाखांनी कमी होऊन देखील शेअर होल्डर्सच्या संख्येच्या बाबतीत येस बँक ही भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक मानली जाते. यावर्षी 31 मार्च 2023 रोजी येस बँकेच्या शेअरधारकांची संख्या 50.6 लाख होती, जी आता 50 लाखांच्या खाली गेली आहे. येस बँकेने शेअर धारकांच्या संख्येच्या बाबतीत टाटा ग्रुप आणि रिलायन्स सारख्या दिग्गज कंपन्यांना देखील मागे टाकले आहेत.
येस बँकेवर 5000 कोटी रुपयेच्या फसवणुकीचे प्रकरण नोंदवले गेले होते, त्यानंतर येस बँकेच्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात शेअर विक्रीला सुरुवात केली होती. त्यांनतर येस बँकेच्या शेअरने जबरदस्त पुनरागमन केले आणि अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला होता. त्यांनतर येस बँक 50.6 शेअर धारकांच्या संख्येबाबत भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक बनली होती. येस बँक आपल्या NPA मध्ये घट करण्यासाठी अनेक युक्त्या अमलात आणल्या आहेत.
24 नोव्हेंबर 2023 येस बँकेचे शेअर्स 1.99 टक्क्यांच्या घसरणीसह 19.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत येस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 27.42 टक्के परतावा कमावून दिला आहे. येस बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 24.75 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 14.40 रुपये होती. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 4.59 टक्के घसरली आहे.
येस बँकेच्या शेअर धारकांची सख्या 48,88,441 आहे. एवढ्या शेअर धारकांसह येस बँक ही भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक बनली आहे. त्यानंतर शेअर धारकांच्या संख्येबाबत दुसऱ्या क्रमांकावर टाटा पॉवर कंपनी आहे. टाटा पॉवर कंपनीकडे 38 लाख पेक्षा जास्त शेअर होल्डर आहे. तिसऱ्या क्रमांकावर टाटा स्टील आणि चौथ्या क्रमांकावर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी आहे. तर पाचव्या क्रमांकावर आयटीसी कंपनी आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Yes Bank Share Price today on 27 November 2023
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं