Zen Technologies Share Price | शेअरने अल्पावधीत 300% परतावा दिला, झेन टेक्नॉलॉजीमध्ये टाटा ग्रुपने गुंतवणूक वाढवली, एंट्री घेणार?

Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आता नुकताच आलेल्या एका बातमीनुसार टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सने कंपनीने झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे 20 लाख शेअर्स खरेदी केले आहेत.
या बातमीमुळे झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कंपनीने झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये 725 रुपये या किमतीवर गुंतवणूक करून 20 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. सध्या हा शेअर (18 डिसेंबर 2023) 0.45% घसरून 761.10 रुपयांवर ट्रेड करत आहे.
टाटा समूहाच्या या कंपनीने झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे एकूण 2.38 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. या संपूर्ण व्यवहाराचे एकूण मूल्य 145 कोटी रुपये आहे. झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या प्रवर्तकांनी 725 रुपये प्रति शेअर किमतीवर कंपनीचे 15 लाख शेअर्स विकले आहेत, या शेअर्सचे एकूण मूल्य 108.75 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 2.94 टक्क्यांच्या वाढीसह 763.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील एका महिन्यात झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सची किंमत फक्त 5 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 85 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सची किंमत 300 टक्क्यांनी वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 911.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 175.15 रुपये होती. सप्टेंबर 2023 मध्ये या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर 20 पैसे लाभांश वाटप केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Zen Technologies Share Price NSE 18 December 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं