Stock in Focus | या मल्टिबॅगेर शेअरची किंमत सध्या 55 टक्क्याने स्वस्त झाली आहे, हा स्टॉक आता खरेदी करावा का?

Stock In Focus| परकीय गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंडांनी मोठ्या प्रमाणात शेअरची विक्री करून गुंतवणुकीत कपात केली आहे. म्युचुअल फंडानी मागील काही काळात मोठ्या प्रमाणात विक्री केलेला स्टॉक आहे,” झेन्सार टेक्नॉलॉजीज लिमिटेड”. हर्ष गोएंका यांच्या RPG समूहाचा भाग असलेली Zensar Technologies कंपनी YTD मध्ये या वर्षी 60 टक्के कमजोर झाली आहे. या पडझडीच्या काळात Zensar Technologies कंपनीच्या शेअर किंमत 533 रुपयांवरून 215 रुपयांवर आली आहे. मागील 11 महिन्यांत ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपयेची गुंतवणुक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 40 हजार रुपये झाले आहे.
FII आणि MF ने शेअर्स विकले :
डिसेंबर 2021 च्या तिमाहीत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार Zensar Technologies या कंपनीमध्ये परकीय गुंतवणूकदारांची होल्डिंग 20 टक्केच्या जवळपास होती. त्याच वेळी, या कंपनीत म्युच्युअल फंडची होल्डिंग 15 टक्के पेक्षा जास्त होती. मार्च 2022 च्या तिमाहीत FII ची होल्डिंग 15 टक्के पर्यंत नोंदवण्यात आली होती, तर म्युचुअल फंडाची होल्डिंग 10-15 टक्के पर्यंत कमी झाली होती. जून 2022 तिमाहीत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या कंपनीमध्ये FII ची होल्डिंग 15 टक्के तर म्युचुअल फंडची होल्डींग 10 टक्केच्या जवळपास आली आहे. सप्टेंबर 2022 च्या आकडेवारीनुसार या कंपनीमध्ये FII ची होल्डिंग 5-10 टक्के पर्यंत कमी झाली आहे. आणि म्युच्युअल फंडाची होल्डिंग 10 पर्यंत कमी झाली आहे.
शेअर्सच्या किंमतीचा इतिहास :
Zensar Technologies कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 55.09 टक्के कमजोर झालेले पाहायला मिळाले आहेत. या काळात कंपनीचे शेअर 480.70 रुपयांवर ट्रेड करत होते, त्यात घट होऊन शेअरची किंमत आता 215.90 रुपयांपर्यंत आली आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 2 टक्के पडला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Zensar Technologies Stock in Focus of Stock market expert and stock price fallen down on 10 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं