Zomato Share Price | झोमॅटोच्या शेअर्समध्ये झाली 20% वाढ, स्टॉकची नवीन टार्गेट प्राईस , स्टॉक तेजीत

Zomato Share Price | आयपीओ आल्यापासून आता पर्यंत ज्या स्टॉक ने गुंतवणूकदारांना सतत चिंतेत लटकते ठेवले आहे असा स्टॉक म्हणजे झोमॅटो. झोमॅटोच्या शेअर्समध्ये मंगळवारी अचानक कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीचे शेअर्स तब्बल 19 टक्के पेक्षा जास्त वाढले आहेत. बीएसईवर कंपनीच्या शेअर्समध्ये 19.96 टक्के वाढ झाली आणि दिवसा अखेर स्टॉक 55.60 रुपयांवर बंद झाला.
झोमॅटोच्या शेअर्समध्ये मंगळवारी अचानक कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे शेअर्स 19 टक्के अप्पर सर्किटवर गेले होते. तर दिवसा अखेर स्टॉक 55.60 रुपये वर जाऊन बंद झाला. ह्या जबरदस्त वाढीनंतर झोमॅटोचे शेअर्स 103 रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असे शेअर बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. उच्च उत्पन्नामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ तोटा निम्म्याने कमी झाला आणि 186 कोटी रुपयांवर आला. कंपनी अजूनही नफ्यात आलेली नाही पण तरीही तज्ञ स्टॉक बाबतीत सकारात्मक दिसत आहे.
लक्ष किंमत 103 रुपये :
जागतिक ब्रोकरेज हाऊस जेफरीजने झोमॅटोच्या शेअर्सवर सकारात्मक खरेदी रेटिंग दिली आहे. जागतिक गुंतवणूक संस्था आणि ब्रोकरेज हाऊस Zomato च्या शेअर्स च्या बाबतीत इतके सकारात्मक आहेत की त्यांनी शेअर्स ची पुढील किंमत 100 रुपयांची असेल असा अंदाज वर्तवला आहे. ब्रोकरेज हाऊस एम्बिटने झोमॅटोच्या शेअर्सला खरेदी रेटिंग देखील दिले आहे. आणि कंपनीच्या शेअर्ससाठी 103 रुपये लक्ष्य किंमत दिली आहे. अलीकडेच कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने म्हटले होते की झोमॅटो शेअर्सचे वाईट दिवस आता संपले आहे. आता कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ अपेक्षित आहे. आणि गुंतवणूकदार नक्कीच ह्या स्टॉकमधून पैसे कमावतील.
जून तिमाहीत झोमॅटोचा तोटा :
मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीचा तोटा कमी झाला असून चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत झोमॅटोचा एकत्रित निव्वळ तोटा 185.7 कोटी रुपयांवर आला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीचा तोटा 356.2 कोटी रुपये होता. त्याच वेळी, झोमॅटो कंपनीने मार्च 2022 च्या तिमाहीचा निव्वळ तोटा 359.7 कोटी रुपये जाहीर केला होता. जून 2022 च्या तिमाहीत झोमॅटोचा एकत्रित महसूल 16 टक्के वरून घसरून 1,414 कोटी रुपये झाला. या ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने जून 2021 च्या तिमाहीत 844 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्याच वेळी, मार्च 2022 च्या तिमाहीत ते 1212 कोटी रुपये पर्यंत पोहोचले होते. आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचे एकूण ऑर्डर मूल्य 6,430 कोटी रुपये झाले आहे. नुकताच स्टॉकचा लॉक इन कालावधी संपल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात विक्री पाहायला मिळत होती, पण आता चित्र बदलत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Zomato Share price investment returns on 3 August 2022
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं