Zomato Share Price | झोमॅटोची टार्गेट प्राईस 100 रुपये, तिमाही निकालानंतर तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला, तेजीचे कारण वाचा

Zomato Share Price | 2022 या वर्षात झोमॅटो कंपनीचे स्टॉक 50 टक्क्यांपेक्षा अधिक कमजोर झाले आहे. पण आता शेअरमध्ये जबरदस्त तेजी येण्याचे संकेत मिळत आहे. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेफरीजने अंदाज व्यक्त केला आहे की, झोमॅटोचे शेअर्स आता तेजीत येऊ शकतात. झोमॅटोने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले होते जे गुंतवणूकदारांना काही प्रमाणात दिलासा देणारे होते. झोमॅटोच्या फूड डिलिव्हरी व्यवसाय आणि ब्लिंकिटमध्ये सकारात्मक वाढ पाहायला मिळाली आहे, त्यामुळे झोमॅटोचे शेअर्स वाढू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
झोमॅटोच्या शेअरची अंदाजित किंमत :
नुकताच स्टॉक मार्केट तज्ञांनी जाहीर केलेल्या अहवालानुसार, ब्रोकरेज फर्म जेफरीजने अंदाज व्यक्त केला आहे की फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे शेअर लवकरच 100 रुपयांची किंमत पातळीपर्यंत ओलांडू शकतात. या ब्रोकरेज हाऊसने या झोमॅटो शेअरला ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की, झोमॅटो कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमतीपेक्षा 40 टक्क्यानी अधिक वाढू शकतात. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झोमॅटो कंपनीचे शेअर NSE निर्देशांकावर 69.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
झोमॅटोची तिमाही कामगिरी :
10 नोव्हेंबर 2022 रोजी झोमॅटो कंपनीचे तिमाही निकाल जाहीर करण्यात आले होते. या निकालांमध्ये कंपनीने स्पष्ट केले आहे की कंपनीला तिमाही कालावधीत 250.80 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत झोमॅटो कंपनीला 434.90 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. जुलै ते सप्टेंबर 2022 या तिमाही दरम्यान झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने 1661.30 कोटी रुपये निव्वळ महसूल कमावला होता. त्याच वेळी, कंपनीने या तिमाहीत 2091.30 कोटी रुपये खर्च केले आहेत.
झोमॅटोच्या ऑर्डर व्हॅल्यूमध्ये पहिल्या तिमाहीचे तुलनेत दुसऱ्या तिमाहीत 3 टक्के पेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी, वार्षिक आधारावर, ही वाढ 23 टक्केच्या जवळपास आहे. झोमॅटो कंपनी तिमाही निकाल जाहीर करताना माहिती दिली आहे की, देशात सध्या ऑनलाईन फूड डिलीव्हरी उद्योग वाढत आहे. त्याच वेळी झोमॅटोने हळूहळू नफ्याकडे वाटचाल सुरू केली आहे. झोमॅटो कंपनीच्या म्हणण्यानुसार कंपनीमध्ये सध्याच्या पातळीपेक्षा अधिक वेगाने वाढ होण्याची क्षमता आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Zomato Share price return on investment on 15 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं