Gold Price Today | बापरे! सोन्याचे दर विक्रम मोडणार? आज दर किती वाढला पहा

Gold Price Today | काल तर विक्रमी पातळीकडे वाटचाल करणाऱ्या सुवर्ण रॅलीला ब्रेक लागला. पण, आज सोने पुन्हा लांब पावलांनी वाढू लागले आहे. चांदी देखील कालच्या घसरणीतून सावरत असून आज वाढीसह व्यापार करत आहे. सोने हळूहळू ५६,२०० रुपयांच्या आतापर्यंतच्या उच्चांकाकडे वाटचाल करत आहे. आज, म्हणजेच शुक्रवार, ६ जानेवारी रोजी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव ०.३१ टक्क्यांच्या वाढीसह व्यापार करत आहे. चांदीचा भावही आज ०.३७ टक्क्यांच्या मजबुतीने ट्रेड करत आहे.
आजचे 24 कॅरेट सोन्याचा भाव :
शुक्रवारी वायदे बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 55,321 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होता, जो कालच्या बंद किंमतीच्या तुलनेत सकाळी 9:15 पर्यंत 31 रुपयांनी वधारला होता. आज सोन्याचा भाव ५५,३८२ रुपयांवर खुला होता. मागील व्यापारी सत्रात हा मौल्यवान धातू ५०० रुपयांनी घसरून एमसीएक्सवर ५५,२६७ रुपयांवर बंद झाला होता. गुरुवारी एमसीएक्सवरील सोन्याचा दर 0.90 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. त्याचबरोबर चांदीमध्येही 1.68 टक्क्यांची घसरण झाली आहे.
चांदीच्या किंमतीतही वाढ
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) चांदीचा भाव आज 251 रुपयांनी वाढून 68,329 रुपये प्रति किलो झाला आहे. चांदीचे दर आज 68,389 रुपयांवर उघडले. एकदा हा भाव ६८,३९५ रुपयांवर गेला. पण, काही वेळाने तो ६९,३३० रुपये झाला. याआधीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमसीएक्सवर चांदी 1,168 रुपयांनी घसरून 68,150 रुपयांवर बंद झाली होती.
सराफा बाजारात काल सोन्याच्या दरात घसरण
भारतीय सराफा बाजारात गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. दिल्ली सोने-चांदीच्या बाजारात सोमवारी सोन्याचा भाव १० रुपयांनी घसरून ५५,९९४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. चांदीही 69,286 रुपये प्रति किलोवर आली आहे. सोन्याचे दर : दिल्ली सोने आणि चांदीच्या बाजारात सोमवारी सोन्याचा भाव ३८,४६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. बुधवारी मौल्यवान धातू ५६,१९५ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीचे दरही गुरुवारी १,४७५ रुपयांनी कमी होऊन ६९,२८६ रुपये प्रति किलो झाले.
आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. आज सोन्याचा भाव ०.८३ टक्क्यांनी घसरून १,८३६.६६ डॉलर प्रति औंस झाला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात आज लक्षणीय घट झाली आहे. चांदी १.८३ टक्क्यांनी घसरून २३.३७ डॉलर प्रति औंसवर होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Gold Price Today update check details on 06 January 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं