Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर धडाम झाले, सोनं खरेदीची अशी सुवर्ण संधी मिळणार नाही, तपासून घ्या नवे दर
Deprecated: Function wp_make_content_images_responsive is deprecated since version 5.5.0! Use wp_filter_content_tags() instead. in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Highlights:
- Gold Price Today
- सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी पातळीच्या खाली घसरण
- सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ
- मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोनं चांदीच्या दरांमध्ये घसरण
- तुमच्या शहरातील आजचे दर

Gold Price Today | मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने आणि चांदीने विक्रमी पातळी गाठल्यानंतर आता सोनं चांदीच्या दरांमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने 61739 रुपये आणि चांदी 77280 रुपये प्रति किलोग्रॅम झाली होती. पण त्यानंतर त्यात घसरण होताना दिसत आहे. सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने होत असलेल्या चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण कायम होती.
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी पातळीच्या खाली घसरण
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी पातळीच्या खाली घसरण झाली आहे. पण तरीही येत्या काळात त्यात वाढ होईल, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दिवाळीत सोने 65,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तर चांदीचा भाव 80,000 रुपये प्रति किलो राहण्याचा अंदाज आहे.
सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ
सराफा बाजाराच्या https://ibjarates.com अधिकृत वेबसाइटनुसार, गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण झाली आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज गुरुवारी सोन्याचा भाव 277 रुपयांनी घसरून 60,113 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदी 352 रुपयांनी वाढून 71350 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली आहे. याआधी बुधवारी चांदी 70988 रुपयांवर बंद झाली होती.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोनं चांदीच्या दरांमध्ये घसरण
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. याआधी बुधवारी एमसीएक्सवर सोने 60198 रुपये आणि चांदी 72102 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. त्यामुळे २५ दिवसांत सोन्याच्या दरात १७०० रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदी 71 हजारांच्या पातळीवर आहे. त्यामुळे चांदीत 6000 रुपयांहून अधिकची घसरण झाली आहे.
तुमच्या शहरातील आजचे दर :
* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५५७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०७६० रुपये
* भिवंडी – २२ कॅरेट सोने : ५५७३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०७९० रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५५७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०७६० रुपये
* लातूर – २२ कॅरेट सोने : ५५७३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०७९० रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 55700 रुपये, 24 कॅरेट सोने : 60760 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५५७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०७६० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५५७३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०७९० रुपये
* पुणे – २२ कॅरेट सोने : ५५७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०७६० रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोने : ५५७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०७६० रुपये
* वसई-विरार – २२ कॅरेट सोने : ५५७३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०७९० रुपये
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Gold Price Today Updates check details on 01 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं