Gold Price Today | लग्नसराईच्या मोसमात सोने-चांदीचा टेक ऑफ, 14 ते 24 कॅरेटचे ताजे दर जाणून घ्या

Gold Price Today | गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. लग्नसराईचा मोसम सुरू होताच सोन्या-चांदीच्या किंमतींनी वेग घेतला आहे. या व्यापारी सप्ताहाच्या पाचव्या व शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोने तसेच चांदीच्या भावात वाढ दिसून आली.
शुक्रवारी सोने 667 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 154 रुपये प्रति किलोने महागले. यानंतर सोने सुमारे 52300 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 61400 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. या वाढीनंतरही तुम्ही 3900 रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षा स्वस्त सोनं आणि चांदी 18600 रुपये प्रति किलो दराने खरेदी करू शकता.
या वाढीनंतर शुक्रवारी म्हणजेच या व्यापारी सप्ताहाच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव ५२२८१ रुपये प्रति किलोवर बंद झाला. तर मागील व्यापाराच्या दिवशी गुरुवारी सोन्याचा भाव स्थिर राहिला. गुरुवारी हा मौल्यवान धातू ५१,५१४ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही शुक्रवारी वाढ झाली. चांदी 154 रुपयांनी वाढून 61,354 रुपये प्रति किलोवर बंद झाली. गुरुवारी चांदीचा दर प्रतिकिलो 350 रुपयांनी कमी होऊन 61,200 रुपये प्रति किलोवर बंद झाला.
१४ ते २४ कॅरेट सोन्याचा नवा भाव
अशा प्रकारे 24 कॅरेट सोन्याचा भाव 667 रुपयांनी वाढून 52,281 रुपये, 23 कॅरेट सोन्याचा भाव 664 रुपयांनी वाढून 52,072 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा भाव 702 रुपयांनी वाढून 47,889 रुपये, 18 कॅरेट सोन्याचा भाव 675 रुपयांनी वाढून 39,211 रुपये आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव 448 रुपयांनी वाढून 30,584 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
आतापर्यंतच्या उच्चांकावरून सोने सुमारे 3900 रुपयांनी आणि चांदी 18600 रुपयांनी स्वस्त
सोने सध्या आपल्या सर्वकालीन उच्चांकी पातळीवरून सुमारे ३९१९ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्तात विकले जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने आपला आतापर्यंतचा उच्चांक गाठला. त्यावेळी सोनं 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमवर गेलं होतं. त्याचबरोबर चांदी त्याच्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 18626 रुपये प्रति किलो दराने स्वस्त मिळत होती. चांदीची सर्वोच्च पातळी 79980 रुपये प्रति किलो आहे.
मिस्ड कॉल देऊन सोन्याची लेटेस्ट किंमत कशी ओळखाल
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे रिटेल दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 मिस्ड कॉल देऊ शकता. थोड्याच वेळात एसएमएसच्या माध्यमातून दर उपलब्ध होतील. यासोबतच वारंवार अपडेट्सबद्दल माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com पाहू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Gold Price Today updates check details on 12 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं