Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड वाढला, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today | सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. आज, बुधवार, 20 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 66000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या अगदी जवळ पोहोचला आहे. आज मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, आणि जळगांव सह सर्व शहरांमध्ये सोन्याने उच्चांकी पातळी गाठली.
आज 24 कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव 65795 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. हा सोन्याचा नवा उच्चांक आहे. मंगळवारच्या 65589 रुपयांच्या बंद भावापेक्षा सोने आज बुधवारी 206 रुपये प्रति 10 ग्रॅम महाग झाले आहे. चांदी मात्र 15 रुपयांनी वधारून 73859 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली.
सोन्याचे दर का वाढत आहेत?
सोन्याच्या या वाढीमागे 3 प्रमुख कारणे आहेत. केडिया कमोडिटीजचे अध्यक्ष अजय केडिया यांनी सांगितले की, सोन्याचे दर वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मंदीची भीती जगाला सतावत आहे. याशिवाय खरेदी आणि लग्नसराईच्या हंगामातही मध्यवर्ती बँकांना मोठी मागणी असते.
आयबीजेएच्या म्हणण्यानुसार, आज सोन्याने आपल्या नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. सोन्याने या महिन्यात चौथ्यांदा नवा उच्चांक गाठला आहे. यापूर्वी 11 मार्च रोजी नवा उच्चांक गाठला होता. या महिन्यात 5 मार्च 2024 रोजी हा उच्चांकी स्तर 64598 रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे 7 मार्चरोजी तो 65049 रुपयांवर पोहोचला आणि इतिहास रचला. मंगळवारी, 11 मार्च रोजी हा विक्रम मोडला, जेव्हा 10 ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीशिवाय 65646 रुपये झाला.
आज सराफा बाजारात 23 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव
आज सराफा बाजारात 23 कॅरेट सोन्याचा सरासरी भाव 206 रुपयांनी वाढून 65553 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. मात्र, जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेस शिवाय 22 कॅरेट सोन्याचा भाव आता 188 रुपये प्रति 10 ग्रॅम ने वाढून 60268 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
आज सराफा बाजारात 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव
आज 18 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅम झाला आहे. आता तो 49192 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर 14 कॅरेट सोन्याच्या दरातही 120 रुपयांनी वाढ झाली आहे. आज तो 38490 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उघडला.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Gold Rate Today Updates check details 20 March 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं