Gold Rate Today | बापरे! आज सोन्याच्या किंमतीने धाकधूक वाढवली, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today | गेल्या दोन महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात कमालीची अस्थिरता होती. त्यावेळी सोन्याच्या भाव 61000 रुपयांच्या रिकॉर्ड स्तरावर पोहोचला होता. चांदीनेही ७७ हजार रुपयांचा विक्रम ओलांडला. मात्र, त्यानंतर दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात घसरण दिसून आली. गेल्या काही दिवसांत 58,000 रुपयांची पातळी गाठल्यानंतर सोन्यात आणखी घसरण झाली आहे. मात्र, मंगळवारीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोन्या-चांदीत तेजी दिसून आली. (Gold Price Today)
सोनं-चांदीच्या दरात काय हालचाल?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) मंगळवारी दोन्ही धातूंच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. सराफा बाजारात मात्र सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. सोनं 58,000 रुपयांपर्यंत खाली आलं आहे. तर चांदी 70 हजारांच्या खाली जात आहे. दिवाळीच्या हंगामात सोने-चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. सोनं पुन्हा एकदा जुन्या विक्रमाच्या जवळ पोहोचू शकतं.
सराफा बाजारात तेजी
आयबीजेएच्या https://ibjarates.com अधिकृत संकेतस्थळावर सराफा बाजाराचे दर दररोज जाहीर केले जातात. मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसून आली. सराफा बाजारात आज सोन्याचा भाव 300 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 58428 रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीचा दर 300 रुपयांनी वाढून 69656 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली आहे. या आधी सोमवारी सोने 58122 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 69327 रुपयांवर बंद झाली होती.
एमसीएक्सवर सोन्या-चांदीत घसरण
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मंगळवारी सोने 113 रुपयांनी वधारून 58390 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 141 रुपयांनी वधारून 70430 रुपये प्रति किलोग्रॅम झाली. याआधी सोमवारी एमसीएक्सवर सोने 58211 रुपये आणि चांदी 70030 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
तुमच्या शहरातील आजचे नवे दर :
* औरंगाबाद, 22 कॅरेट सोने : 54050 रुपये, 24 कॅरेट सोने : 58960 रुपये
* भिवंडी, 22 कॅरेट सोने : 54080 रुपये, 24 कॅरेट सोने : 58990 रुपये
* कोल्हापूर, २२ कॅरेट सोने : ५४०५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५८९६० रुपये
* लातूर, २२ कॅरेट सोने : ५४०८० रुपये, २४ कॅरेट सोने : ५८९९० रुपये
* मुंबई, 22 कॅरेट सोना : 54050 रुपये, 24 कॅरेट सोना : 58960 रुपये
* नागपूर, २२ कॅरेट सोने : ५४०५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५८९६० रुपये
* नाशिक, २२ कॅरेट सोने : ५४०८० रुपये, २४ कॅरेट सोने : ५८९९० रुपये
* पुणे, 22 कॅरेट सोने : 54050 रुपये, 24 कॅरेट सोने : 58960 रुपये
* सोलापूर, २२ कॅरेट सोने : ५४०५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५८९६० रुपये
* ठाणे, २२ कॅरेट सोने : ५४०५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५८९६० रुपये
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Gold Rate Today Updates check details on 04 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं