Gold Rate Today | दिवाळीपूर्वी खुशखबर! सोन्याचे भाव अजून खाली घसरले, अशी संधी सोडू नका, दिवाळीपूर्वी स्वस्तात खरेदी करा

Gold Rate Today | बाजारातील सोन्याची मागणी आणि पुरवठ्याच्या आधारे सोन्याची किंमत ठरवली जाते. सोन्याची मागणी वाढली तर दरही वाढणार आहेत. सोन्याचा पुरवठा वाढला तर भाव कमी होतील. सोन्याच्या किमतीवर जागतिक आर्थिक परिस्थितीचाही प्रभाव असतो. उदाहरणार्थ, जर आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेची कामगिरी खराब असेल तर गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करतील, हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होणार आहे.
आज सोन्याचा भाव
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 56477 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 56555 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 78 रुपयांनी घसरला आहे.
आज सोन्याचा भाव उच्चांक किंमतीपासून किती स्वस्त?
सध्या सोन्याचा भाव 5,108 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते. आज चांदीचा भाव 66537 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 67204 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.
त्यामुळे आज चांदीच्या दरात प्रति किलो ६६७ रुपयांची घसरण झाली आहे. चांदी 9927 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.
तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर :
* औरंगाबाद – 22 कॅरेट सोने : 52500, 24 कॅरेट सोने : 57230 रुपये
* भिवंडी – २२ कॅरेट सोने : ५२५३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७२६० रुपये
* कोल्हापूर – 22 कॅरेट सोने : 52500, 24 कॅरेट सोने : 57230 रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 52530 रुपये, 24 कॅरेट सोने : 57260 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 52500, 24 कॅरेट सोने : 57230 रुपये
* नागपूर – 22 कॅरेट सोने : 52500, 24 कॅरेट सोने : 57230 रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५२५३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७२६० रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 52500, 24 कॅरेट सोने : 57230 रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोने : ५२५००, २४ कॅरेट सोने : ५७२३० रुपये
* ठाणे – 22 कॅरेट सोने : 52500, 24 कॅरेट सोने : 57230 रुपये
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Gold Rate Today Updates check details on 07 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं