नव्हे नव्हे नवे रस्ते घडवलेत तरी नवा महाराष्ट्र घडेल; सुमित राघवन यांचा आदित्य यांना टोला

मुंबई: स्मार्ट सिटी’च्या वल्गना करत मोफत वायफायसारख्या सुविधा देण्याच्या घोषणा करणाऱ्या मुंबई, ठाणे यांसारख्या शहरांतील रस्त्यांची अवस्था पाहिली तर ‘आपण खेडय़ात तर नाही ना’ असा प्रश्न निर्माण होतो. अशा खड्डेमय रस्त्यांवरून दररोज प्रवास करणारे सर्वसामान्य एकीकडे मिळेल त्या माध्यमातून आपल्या वेदना मांडत असताना मराठी चित्रपट-नाटय़सृष्टीतील कलाकारांनीही यात आपला आवाज सामील केला आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव, चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी यांच्यासह आता अभिनेता पुष्कर श्रोत्री यानेही प्रशासनावर जोरदार टीका केली.
दरम्यान, मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये शिवसेनेची सत्ता असल्याने आता मराठी कलाकारांनी शिवसेनेवर देखील लक्ष केंद्रित केलं आहे. शिवसेनेच्या विरोधामुळं गाजत असलेल्या मुंबईतील मेट्रो-३ प्रकल्पाला पाठिंबा दिल्यानंतर अभिनेता सुमीत राघवन यानं आता पुढचं पाऊल टाकलं आहे. सुमीतनं ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना मुंबईतील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून सुनावलं आहे. सुमीतच्या या ट्विटची राजकीय व सांस्कृतिक वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
आदित्य यांच्या या ‘नव्या महाराष्ट्रा’च्या ट्विटवर सुमीतनं अत्यंत बोचरी प्रतिक्रिया दिलीय. ‘नवे रस्ते घडवलेत तरी नवा महाराष्ट्र घडेल,’ असं त्यानं म्हटलंय. सोबत #येरेमाझ्यामागल्या असा हॅशटॅगही दिलाय. सुमीतच्या या टीकेला शिवसेना कसं प्रत्युत्तर देते, हे आता पाहावं लागणार आहे.
नव्हे नव्हे नवे रस्ते घडवलेत तरी नवा महाराष्ट्र घडेल. #येरेमाझ्यामागल्या https://t.co/Ls7Dx3f0Wz
— Sumeet (@sumrag) September 21, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं