मनसे नेते अमित ठाकरे उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल

मुंबई, १९ ऑक्टोबर : देशभरात कोरोना वाढीचा आलेख एकिकडे उंचावत असतानाच दुसरीकडे त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांच्या बळावर देशाची या विषाणूशी सुरु असणारी झुंज काही बाबतीत यश मिळवताना दिसत आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे त्याचच एक उदाहरण. दरम्यान, सर्वत्र कोरोनामुळं चिंतेचं वातावरण असतानाच केंद्रान या संसर्गाच्या निरीक्षणासाठी नेमलेल्या समितीनं एक दिलासादायक बाब स्पष्ट केली आहे.
कोरोनाचा झपाट्यानं फैलाव होत असताना हैदराबाद आयआयटीचे प्राध्यापक एम. विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखालील एका समितीच्या अहवालानुसार सध्या फोफावणारी कोरोनाची लाट फेब्रुवारी महिन्यात उतरणीला लागेल. तोपर्यंत लस विकसित झाल्यास हा संसर्ग बऱ्याच अंशी नियंत्रणातही आलेला असेल. हा एक प्रकारे मोठा दिलासा असला तरीही योग्य काळजी न घेतल्यास कोरोना रुग्णांची संख्या तोवर १.६ कोटींच्या घरात पोहोचू शकते. सणासुदीच्या दिवसांची पार्श्वभूमी पाहता रुग्णसंख्येत तब्बल २६ लाखांनी वाढ होण्याचा संभाव्य धोक्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
देशभरात अशी स्थिती असताना मागील काही दिवसात अनेक राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव मनसे नेते अमित ठाकरेंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
सोमवारी सकाळी मनसे नेते अमित ठाकरे यांना वांद्रे येथील लिलावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या २ दिवसांपासून अमित ठाकरेंना ताप जाणवत होता, प्रामुख्याने त्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली आहे, मलेरिया चाचणीही निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितले आहे. परंतु खबरदारी म्हणून त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
अमित ठाकरे यांनी कोरोना काळात अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या, अंगणवाडी सेविकांचा प्रश्न त्यांनी राज्य सरकारकडे मांडल्या होत्या, त्यानंतर डॉक्टरांच्या शिष्टमंडळानेही अमित ठाकरेंची भेट घेऊन अपुऱ्या वेतनाबाबत समस्या मांडली होती, त्यानंतर अमित ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याबाबत पत्र लिहिलं होतं, आरे येथील मेट्रो कारशेड बाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचं अमित ठाकरेंनी स्वागत केले होते
News English Summary: Maharashtra Navnirman Sena chief Raj Thackeray’s son Amit Thackeray was admitted to Lilavati hospital in Mumbai on Monday morning, following complaints of fever. His covid-19 test has come negative. He has also undergone a malaria test and that too is negative. He is currently receiving treatment and is under observation.
News English Title: Amit Raj Thackeray Admitted in Lilavati hospital News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं