अमित ठाकरेंचा पाठपुरावा कामी; गर्भवती महिलांना दिव्यांग प्रवाशांच्या डब्यातून प्रवासाची मुभा आणि...

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या मांडल्या. तसेच अमित ठाकरे व त्यांच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात ३२ सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या होत्या. या सूचनांपैकी काहींवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मकता दाखवली आहे. त्यांपैकी कोणत्या सूचनांवर कारवाई केली जाईल वा करण्यात आली आहे याबाबतची माहिती अमित ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
- गर्भवती महिलांना दिव्यांग प्रवाशांच्या डब्यातून प्रवास करू देण्याची मुभा द्यावी, ही मागणी प्रशासनाने मान्य केली आहे.
- महिला प्रवाशांच्या डब्यात फेरीवाल्यांची घुसखोरीला आळा घालता यावा, यासाठी रेल्वेने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
- महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि रेल्वे पोलीस यांच्यात समन्वय असावा, या मागणीवर तात्काळ संबंधित पोलीस आयुक्तांशी पत्रव्यवहार सुरू झाला आहे.
- स्टेशन परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी महापालिकांशी समन्वय वाढावा अशी मागणी होती. यावर हालचाल होऊन महापालिका आणि रेल्वे यांच्यात संवाद सुरू झाल्याची ग्वाही प्रशासनाने दिली आहे.
- यासह कल्याण, डोंबिवली, खडवली, ठाकुर्ली आणि इतर अनेक रेल्वे स्थानकातील गैरसोयींकडे आम्ही प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये अस्वच्छ पिण्याच्या पाण्यापासून ते विशेष ट्रेन सुरू करण्यापर्यंत अनेक मुद्दे आहेत.
आदी काही सूचनांबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक आहे. तर लवकरच त्या पूर्ण होतील, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. आश्वासनांची पूर्तता होईपर्यंत याचा पाठपुरावा होईलच, असे त्यांनी म्हटले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं