शिव वडापाव आणि थाळीच्या घवघवीत यशानंतर आता शिव दवाखाने | पण इथे कंपाऊंडर असतील

मुंबई, १७ ऑगस्ट : मी जागतिक आरोग्य संघटनेविषयी WHO केलेल्या वक्तव्याचा आपल्याकडे निषेध होण्याचे कारण नाही. उलट या वक्तव्यासाठी भाजपवाल्यांनी मला पाठिंबा द्यायला हवा. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही WHO वर टीका केली होती. परंतु, ट्रम्प हे पंतप्रधान मोदींचे मित्र आहेत. त्यामुळे भाजपने या मुद्द्यावर मला पाठिंबा द्यायला हवा, असे संजय राऊत यांनी सांगितले. यापूर्वी मोदींनी लंडनला जाऊन अपमान केला होता. आपल्याकडच्या डॉक्टरांना पैसे कमावण्यात रस असल्याचे बोलले होते. मग मोदींनी बोलल्यावर का टीका होत नाही, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
तसेच जागतिक पातळीवरील अनेक नेत्यांनी WHO ला फटकारले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनीही WHO चीनची हस्तक असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे माझ्यावर टीका करण्याआधी तुम्ही ट्रम्प आणि पुतीन यांचाही निषेध केला पाहिजे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी खासदार संजय राऊत आणि शिवसेनेच्या विविध योजनांचा उल्लेख करत खिल्ली उडवली आहे. याबद्दल ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “शिव वडापाव आणि थाळीच्या घवघवीत यशा नंतर आता येत आहेत शिव दवाखाने…इथे डॉक्टरांच्या ऐवजी कंपाऊंडर असतील.
शिव वडापाव आणि थाळीच्या घवघवीत यशा नंतर आता येत आहेत शिव दवाखाने…
इथे डॉक्टरांच्या ऐवजी
कंपाऊंडर असतील.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 17, 2020
News English Summary: BJP MLA Atul Bhatkhalkar has ridiculed MP Sanjay Raut and Shiv Sena’s various schemes. Tweeting about it, he said, “After Shiv Vadapav and Thali’s resounding success, now Shiv dispensaries are coming….There will be compounders instead of doctors.
News English Title: BJP MLA Atul Bhatkhalkar twit over Sanjay Raut clarification on remark about WHO News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं