मनसेच्या भगव्या मोर्चात भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी होणार?

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या महाअधिवेशनात झेंडा बदलल्यानंतर पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात भूमिका जाहीर केली होती. आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चाही काढणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घुसखोरांच्या प्रश्नावर ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली होती. उद्धव ठाकरे म्हणाले होते, घुसखोरांचा विषय हा पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला होता. शिवसेनेने त्यांच्या विरोधात आंदोलनही केलंय. घुसखोरांना देशाबाहेर हाकललेच पाहिजे. घुसखोरांविरोधातल्या आंदोलनाचं श्रेय इतरांनी घेऊ नये असा टोलाही त्यांनी राज ठाकरेना लगावला.
एका बाजूला असं चित्र असताना भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांची भेट झाल्याची माहिती मिळत असून, भारतीय जनता पक्षाने या मोर्चाला अधिक बळकटी मिळावी यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आदेश दिले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्यातील प्रमुख नेते मात्र यामध्ये सहभागी होणार नसल्याचं समजतं.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या मोर्चात सहभागी होणारे भाजपचे कार्यकर्ते हे हातात तिरंगा झेंडा घेऊन सहभागी होणार असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला पाठिंबा देणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाअधिवेशनात घेतलेली हिंदुत्वाची भूमिका, तसेच पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांना पळवून लावण्यासाठी काढत असलेला मोर्चा यामुळे मनसे आणि भारतीय जनता पक्षामध्ये जवळीक वाढली आहे. तसेच मोर्चासाठी मनसेने खास भगवी टोपी तयार केली असून, ही टोपी मनसेच्या नव्या झेंड्याप्रमाणेच असणार आहे. तसेच या मोर्चासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील विभाग अध्यक्षांकडे महत्वाची जबाबदारी दिली आहे.
Web Title: BJP Party workers will participate in MNS Morcha against Bangladeshi Pakistani infiltrators.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं