मुंबई महापालिकेची तोंडावर आपटण्याची मालिका सुरूच, ऋतूजा लटकेचा राजीनामा उद्या सकाळपर्यंत मंजूर करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Andheri East By Poll Election | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा मिळालाय. मुंबई उच्च न्यायालयाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिलेत. त्यामुळे हा शिंदे सरकारला दुसरा झटका असल्याचं मानलं जात आहे.
ऋतूजा लटके राजीनामा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला चांगलाच झटका दिला आहे. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करा आणि याचिकाकर्त्यांना तसे कळवा, असे आदेशच उच्च न्यायालयाने दिला आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण त्या महापालिकेच्या सेवेत होत्या, त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण पालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचं काय होणार याबद्दल संदिग्धता होती.
ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर स्पष्टीकरण देताना पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी 30 दिवसात हा राजीनामा स्वीकारला जाईल असं स्पष्टीकरण दिलं होतं. त्यावर ऋतुजा लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ऋतुजा लटके यांच्या बाजूने निकाल देताना त्यांचा राजीनामा उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारावा असे निर्देश दिले.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Bombay High Court decision in favor of Rutuja Latke check details 13 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं