मुंबईतील ५५ पेक्षा जास्त वयाच्या पोलिसांनी घरी थांबावे, आयुक्तांचे आदेश

मुंबई, २८ एप्रिल : कोरोना माहामारीवर मात करण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन असताना पोलीस खातं मात्र दिवस-रात्र काम करत आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ पोलीस कर्मचा-यांना घरी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खरंतर आतापर्यंत ३ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे हा निर्णय मुंबई पोलिसांकडून घेण्यात आला आहे.
त्याप्रमाणे मुंबईतील ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपत नाही. तोपर्यंत पोलिस ठाण्यात येण्याची आवश्यकता नाही. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी सर्व ९४ पोलिस ठाण्यांना या संदर्भातील आदेश दिले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन ३ मे रोजी संपणार आहे. पण मुंबईतील कोरोना विषाणूबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या लॉकडाऊनच्या कालावधीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
आमचे पोलीस अधिकारी-कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून या शहराचं संरक्षण करत आहेत. त्यांचं आरोग्य आणि सुरक्षितता आमच्यासाठी महत्वाची आहे, असं पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितलं.
News English Summary: The second phase of lockdown does not end with police personnel over the age of 55 in Mumbai. Until then, there is no need to come to the police station. Mumbai Police Commissioner Parambir Singh has issued orders to all 94 police stations in this regard.
News English Title: Can opt to stay at home Mumbai Police cops over 55 yrs old told after 3 die of Covid 19 News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं