महापरिनिर्वाण दिन- राज्यपाल, मुख्यमंत्री व महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांनी आज चैत्यभूमी, दादर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले. pic.twitter.com/oJm6Vb2Goy
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 6, 2019
काल गुरुवारी संध्याकाळपासूनच देशातील कानाकोपऱ्यातून भीमाची लाखो लेकरे चैत्यभूमीकडे येण्यास सुरुवात झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी ही अलोट गर्दी दादर स्थानकातून हळूहळू चैत्यभूमीकडे सरकत आहे.
दादरमधील शिवाजी पार्कवर जणू भीमसागर उसळल्याचं चित्रं पाहायला मिळत आहे. झालं आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासनानेही जय्यत तयारी केली असून शिवाजी पार्कवर सर्व सोयी -सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. ३ डिसेंबरपासूनच देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भीमसैनिक चैत्यभूमीवर येऊ लागले आहेत. यंदाच्या वर्षी चैत्यभूमीवर गर्दीचा उच्चांक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
महाडचे चवदार तळे सत्याग्रह, (२० मार्च १९२७), मनुस्मृती दहन (२५ डिसेंबर १९२७), शेतकऱ्यांची चळवळ (१९२८), पर्वती देवालय प्रवेश (१९२९), काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (१९३१), पुणे करार (१९३२), येवला परिषद (१९३५), बौद्ध धर्मात प्रवेश (१४ ऑक्टोबर १९५६), बावीस प्रतिज्ञा, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील महत्वाचे सत्याग्रह आणि आंदोलनं म्हणावी लागतील.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं