उर्मिलाच्या हटके प्रचारामुळे गोपाळ शेट्टींना सारखे मोदी-मोदी-मोदी इव्हेंट करण्याची वेळ?

मुंबई : काँग्रेसच्या उत्तर मुंबई लोकसभा उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा झंझावाती प्रचार सुरू आहे. उर्मिलाच्या प्रचाराच्या वेगवेगळ्या फंड्यांमुळे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार गोपाळ शेट्टींविरोधात आव्हान निर्माण केले. भयभीत झालेल्या गोपाळ शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा उर्मिलाच्या प्रचार रॅलीत मोदी…मोदीच्या घोषणा दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या घोषणाकडे दुर्लक्ष केल्याने नवा संघर्ष टळला.
उत्तर मुंबईतले उमेदवार उर्मिला मातोंडकर आणि गोपाळ शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्षाला सुरुवात झाली आहे. सोमवारी बोरिवलीत उर्मिला मातोंडकरच्या सभेत भाजप कार्यकर्त्यांनी घुसून राडा केला. या प्रचार रॅलीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदी-मोदी अश्या घोषणा देत हुल्लडबाजी केली. हा गोंधळ मिटतो ना मिटतो पुन्हा एकदा मालाड येथील उर्मिलाच्या प्रचारादरम्यान मोदी-मोदी-मोदीच्या घोषणा देण्यात आल्या. मात्र उर्मिला आणि कार्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मतदानाला अजून बरेच दिवस शिल्लक आहेत. तोपर्यंत उत्तर मुंबईत भारतीय जनता पक्ष विरूद्ध काँग्रेस हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मागील ३-४ दिवसांपासून भाजपचे उमेदवार उर्मिला मातोंडकरच्या हटके आणि आक्रमक प्रचारामुळे हैराण झाले आहेत. त्यामुळे ज्याठिकाणी काँग्रेसची प्रचार रॅली असते तेथे काही लोकांना मॅनेज करून मोदी-मोदी-मोदी अशा घोषणा द्यायला सांगितल्या जातात. ज्यामुळे बघ्यांना वाटावं की लोकांना मोदीच हवे आहेत, परंतु ते ठरवून केलेले इव्हेंट असल्याचं नीट निरीक्षण केल्यास स्पष्ट जाणवतं. त्यामुळे नवोदित उमेदवाराने देखील भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना घाम फोडल्याच पाहायला मिळालं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं