‘काँग्रेसमुक्त भारत’ ही भाजपाची फालतू कल्पना: उद्धव ठाकरे

मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतील आहे. यावेळी उद्धव विविध विषयांना हात घालत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सेना-भारतीय जनता पक्षाची युती, प्रलंबित राम मंदिर, शेतकरी आत्महत्येपासून पक्षांतर करणारे उमेदवार अशा विविध विषयांवर मत व्यक्त केले आहे. परंतु, याच मुलाखतीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या अनेक मतांशी सहमती दर्शवली मात्र अनेक विषयांशी असहमती देखील दर्शवली.
त्यावेळी भाजपाची काँग्रेसमुक्त भारत ही फालतू कल्पना असल्याचे उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीमध्ये सांगितल. यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना, ‘काँग्रेसमुक्त भारत झाल्यास या देशातील सगळे प्रश्न संपतील असं आपल्याला वाटतं का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ या भूमिकेला आपला विरोध असल्याचे उद्धव यांनी सांगितले. ‘काँग्रेसमुक्त देश किंवा काँग्रेस नष्ट करा असं मी कधीच बोललो नाही. मुळात विरोधी पक्ष असायलाच हवा,’ असं उद्धव यांनी सांगितले. यावर बोलताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी विरोधीपक्षाबद्दल दिलेला सल्लाही उद्धव यांनी सांगितला. ‘मुख्यमंत्र्यावर तर जबाबदारी असतेच पण विरोधी पक्षनेत्यावर त्याहून मोठी जबाबदारी असते. मुळात विरोध करणं म्हणजे आकांडतांडव करणे असं नाही.
विरोधी पक्षनेत्यासुद्धा जबाबदारी असते. जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका त्याला जास्त पार पाडावी लागते,’ असं एकादा विरोधीपक्षाबद्दल बोलताना शिवसेनाप्रमुखांनी मला सांगितलं होतं अशी आठवण उद्धव यांनी या प्रश्नाला उत्तर देताना करुन दिली. तसेच आज काँग्रेसची अवस्था ही निर्णायकी आहे हे नक्की. त्यांच्याकडे आता नेतृत्व म्हणून नरसिंह राव, मनमोहन सिंग यांच्यासारख्या उंचीची नेते मंडळी नाहीत,’ असं उद्धव यांनी सांगितलं. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कामाची स्तृती उद्धव ठाकरे यांनी केली. ‘मनमोहन सिंगांनीसुद्धा पहिली पाच वर्षं चांगलंच काम केलं पण त्या दर्जाची माणसं आता पक्षात दिसत नाहीत,’ असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं