धरणक्षेत्रातील खेकड्यांसंबंधित अहवाल मागवला; विधानसभेपूर्वी नव्या 'टेंडरला' तोंड फुटण्याची शक्यता

मुंबई : चिपळूण येथील तिवरे धरण फुटल्यामुळे २० पेक्षा अधिक जणांना दुर्दैवाने जीव गमवावा लागला होता. त्यानंतर संबधित घटना खेकड्यांमुळे फुटल्याचे विधान जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी केल्यांनतर त्यांच्यावर सर्वबाजूने जोरदार टीका झाली होती. विरोधकांनी सावंत यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेत त्यांच्या निवासस्थानी खेकडे सोडले होते. सदर घटना जरी चिपळूण येथील तिवरे धरणाच्या फुटाण्यासंबंधित असली तरी राज्यातील अनेक धरणाची अवस्था ही अत्यंत भयानक आहे. दरम्यान जलसंपदा खात्याकडे स्थानिक अनेक तक्रारी देखील देत असतात.
राज्याच्या जलसंपदा विभागाने अधीक्षक अभियंत्यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील धरणांना खेकड्यांपासून धोका आहे का, याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. तसेच मातीच्या धरणांनाच खेकड्यांपासून धोका असतो, अशी चर्चा आहे. परंतु एका संशोधनात सर्वच प्रकारच्या धरणांना खेकड्यांपासून धोका निर्माण होऊ शकतो, असे म्हटले आहे. खेकडे मातीत बीळ करू शकतात, त्याच ताकदीने मुरुमही पोखरू शकतात अशी माहिती आहे.
दरम्यान, जलसंपदा विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील विविध ठिकाणच्या धरणांची चौकशी होणार आहे. तसेच ज्या धरणांना धोका आहे त्या धरणांची डागडुजीही करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या संकटांपासून नागरिकांची सुरक्षा होणार आहे. त्यामुळे दुरुस्तीपेक्षा सरकार खेकड्यांच्या अहवालावर नेमका कशा संबंधित टेंडर निवडणुकीच्या तोंडावर काढेल ते सांगता येणार नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं